MLA Suresh Bhole: रस्ता किती खराब झालाय, चालता येत नाही; भाजप आमदारावर चिमुरडा संतापला, व्हिडिओ झाला व्हायरल

जळगाव, निलेश पाटील : शहरात सध्या रस्त्याची परिस्थिती खूप बिकट झाली आहे. यातच महानगरपालिका मध्ये प्रशासक असल्याने याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. यातच जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी आज शहरातील द्वारका नगर मध्ये रस्त्याची पाहणी केली. यात परिसरातील समस्या नागरिक आमदार सुरेश भोळे यांना सांगत होते त्यातच एक चिमुरडाही तिथे आला आणि आमदार सुरेश भोळे यांना रस्त्याबाबत जाब विचारू लागला.

व्हायरल व्हिडिओत नेमके काय?

या चिमुरड्याने आमदार सुरेश भोळे यांना रस्ता कसा करून टाकला आहे. रस्ता किती खराब झाला आहे चालता सुद्धा येत नाही असा सवाल केला. यावर उपस्थित नागरिकांनी चिमुरड्याचे वाक्य ऐकून आश्चर्य व्यक्त केले. आमदार सुरेश भोळे यांनी चिमुरड्याला वाढदिवस कधी आहे तुझा असे विचारले त्यावर त्या चिमुरड्याने ३० जून तारीख आहे असं सांगितले मात्र रस्ता दुरुस्त करा असे त्या लहान चिमुरड्याने आमदार भोळे यांना सांगितले.
मटा रिपोर्ताज: खड्डोपंतांचे अड्डे!

गेल्या आठवड्यात डीपीडीसीच्या बैठकीत आमदार सुरेश भोळे यांनी जळगाव शहराच्या खड्डेमय रस्त्यांबाबत ऐकताना धारेवर धरले होते रस्ते दुरुस्ती करण्याचे जबाबदारी कुणाची आहे हे आयुक्तांनी स्पष्ट करावे यावर आयुक्तांनी जबाबदारी महानगरपालिकेची असल्याचे स्पष्ट केले.


पावसाळ्यामध्ये अक्षरशः चिखलातून नागरिकांना घरापर्यंत जावे लागत आहे. चिखलातून काही नागरिकांची वाहन स्लिप होण्याची घटना देखील घडली आहे. अशातच आज आमदार सुरेश भोळे शहरातील द्वारका नगर भागात रस्ता पाहणी करण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी नागरिकांनी भोळे यांना रस्त्याच्या प्रश्नांवरुन धारेवर धरले, मात्र यात एक चार वर्षाचा चिमुरडा पूर्वांश महाले त्या ठिकाणी आला आणि त्याने आमदार सुरेश भोळे यांना हे काय रस्ते झाले. किती चिखल झाला आहे, रस्ते कधी दुरुस्त होतील असा जाब विचारला आमदार भोळे यांनी सुद्धा चिमुरड्याचा सवाल ऐकून हास्य दिले. तिथे जमलेल्या एका स्थानिकाने पूर्वांशला उचलून लहान मुलाला कळले आहे मामा, पण महानगरपालिकेला रस्ते खराब झाले असल्याचे कळत नाही असा टोला लगावला. यावर आमदार सुरेश भोळे यांनी त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

Source link

jalgaon newsmla suresh bhole newssuresh bhole videoVidhan Sabha Electionआमदार सुरेश भोळेजळगावव्हायरल व्हिडिओसोशल मीडिया
Comments (0)
Add Comment