काय आहे प्रकरण?
अंकुश उर्फ गुड्डू पिंटू बागडी (वय ३७) व त्याचे वडील पिंटू नंदलालजी बागडी (वय ७३, दोघेही रा. सराफा बाजार), अशी अटकेतील बाप-लेकांची नावे आहेत. हेडकॉन्स्टेबल संजय रामलाल शाहू, असे जखमी पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. अंकुश बागडी याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास शाहू हे सहकाऱ्यासह त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी अंकुशच्या घरी गेले. शाहू यांनी आवाज दिला असता अंकुश हा कुत्रा घेऊन बाहेर आला. शाहू यांनी त्याला परिचय देत ‘पोलिस ठाण्यात कारवाई करण्यासाठी सोबत चाल’, असे म्हटले. मात्र, अंकुश याने शाहू यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पिंटूही बाहेर आले. त्यांनीही शिवीगाळ करीत, कारवाई केल्यास पाहूण घेण्याची धमकी शाहू यांना दिली व दोघेही पसार झाले. यादरम्यान कुत्र्याने शाहू यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला चावा घेतला. शाहू यांच्या सहकाऱ्याने शाहू यांना वाचविण्यासाठी कुत्र्यावर काठी उगारली असता कुत्राही पळाला. जखमी शाहू यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून बाप-लेकाला अटक केली.
वर्दीचा धाक उरला नाही?
दुसरी घटना : पोलिसावर कोयत्याने हल्ला
हडपसर : रस्त्यावर सुरू असलेले भांडण सोडवायला गेलेल्या सहायक पोलिस निरीक्षकावरच कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना सय्यदनगर परिसरात घडली. यामध्ये पोलिस अधिकाऱ्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून, मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. नागरिकांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. दरम्यान, दोघेही हल्लेखोर पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. रत्नदीप गायकवाड असे जखमी सहायक निरीक्षकाचे नाव आहे. ते वानवडी पोलिस ठाण्यांतर्गत महंमदवाडी पोलिस चौकीचे प्रभारी अधिकारी म्हणून नेमणुकीस आहेत.गेल्या आठवड्यात कात्रज येथे वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याला एका वाहनचालकाने मारहाण केल्याची घटना घडली.