Nitesh karale on anil Deshmukh : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी घडलेल्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. हा हल्ला कोणी केला याबाबत प्रसिद्ध गुरूजी नितेश कराळे यांनी खळबळजनक दावा केला आहे.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर भ्याड हल्ला झाला. अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख उभे असून त्यांच्याविरोधात चरणसिंह ठाकूर उभे आहेत. त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक केली. या हल्ल्याध्ये ते जखमी झाले असून त्यांना रूग्णालयामध्ये भरती करण्यात आलं आहे. हा हल्ला म्हणजे स्पष्ट या महाराष्ट्रात चित्र आहे की, महायुती आता भांबावली आहे. बेबुंदशाहीचं वातावरण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू आहे. त्यांना आता कळून चुकलं आहे की आपला पराभव पक्का आहे. याच्या अगोदर गणेश गिते यांच्या भावावर झाला होता. असा हा दुसरा हल्ला राष्ट्रवादीच्या नेत्यावर आहे, यांनी आता टार्गेट केल्याचं नितेश कराळे यांनी म्हटलं आहे.
शरद पवार यांच्या ज्या सभा गाजल्या आणि महाराष्ट्रातील सत्तापालट करण्यामध्ये शरद पवारांचे योगदान आहे. म्हणून आता त्यांच्या नेत्यांना टार्गेट केले जात आहे कारण त्यांचे सीट येऊ द्यायचे नाही. महाविकास आघाडीचे सरकार तयार नाही झाले पाहिजे यासाठी हे अशा प्रकारचे भ्याड हल्ले करत असून अशा हल्ल्यांचा आम्ही निषेध करतो, असं कराळे गुरूजी म्हणाले. या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी व्हावी. जे कोणी दगडफेक करणारे चरणसिंग यांचे कार्यकर्ते होते त्यांना लवकर प्रशासनाने अटक करावी, अशी मागणी कराळे यांनी केली आहे.