सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता नववी आणि अकरावी नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ; २५ ऑक्टोबरपर्यत करता येणार अर्ज

CBSE Class 9, 11 Registration 2023 Last Date Extended: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) बोर्ड परीक्षा २०२४ साठी इयत्ता ९ वी आणि ११ वी साठी नोंदणीची अंतिम मुदत वाढवली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार, विद्यार्थ्यांना आता २५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत नोंदणी करता येणार आहे. शाळेचे अधिकारी अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर जाऊन नवीन वेळापत्रक तपासू शकतात. सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर याबद्दलचा तपशील देण्यात आला आहे.

शिवाय, बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार विद्यार्थ्यांनी एलओसीमध्ये (List Of candidates) मध्ये सादर केलेल्या विषयांमध्ये कोणतेही बदल या विवित तारखेपर्यंत स्वीकारले जातील. सोबतच, सीबीएसईने शाळांना विद्यार्थ्यांचे आणि विषयांचे तपशील काळजीपूर्वक सादर करण्याच्याही सूचना दिल्या आहेत. कारण त्यानंतर पुनरावृत्तीची संधी दिली जाणार नाही.

(वाचा : CBSE: सीबीएसई बोर्डाने जाहीर केले दहावी-बारावी २०२४ परीक्षेचे वेळापत्रक, जाणून घ्या केव्हा असणार अंतिम परीक्षा)

सीबीएसईने १७ ऑगस्ट, ६ सप्टेंबर, २० सप्टेंबर आणि २६ सप्टेंबर यादीवशी ४ अधिसूचना जाहीर केल्या होत्या ज्यामध्ये शाळांना त्यांचा डेटा पूर्ण करण्यास आणि विद्यार्थी आणि विषयांचा तपशील LOC मध्ये योग्यरित्या भरण्यास सांगितले होते. त्यानंतर, एलओसी सादर केल्यानंतर विषय दुरुस्तीचा कोणत्याही प्रकारे विचार केला जाणार नाही, असेही यात नमूद करण्यात आले.

CBSE ९ वी आणि ११ वीसाठी नोंदणी कशी करावी :

– सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
– यानंतर नोंदणी लिंकवर क्लिक करा.
– सर्व तपशील भरा आणि सबमिट करा.
– कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा.
– यानंतर, फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.

दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक CBSE मंडळाने जाहीर केले आहे. मात्र, सविस्तर वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात मंडळाकडून अधिकृत वेबसाइटवर अंतिम वेळापत्रक जाहीर केले जाईल, असे मानले जाते.

(वाचा : CBSE Exams 2024: सीबीएसई बोर्डाच्या पेपर पॅटर्नमध्ये मोठा बदल; दहावी आणि बारावीच्या परीक्षांमधला हा मोठा बदल)

Source link

board examscbse 2024cbse boardcbse board newscbse board updatescbse exam 2024cbse exam datecbse latest updatecbse registration date extendcbse students
Comments (0)
Add Comment