मुंबई विद्यापीठातील ग्रंथ प्रदर्शनाचा उद्याचा शेवटचा दिवस; भारतरत्न डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाममांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन

University Of Mumbai News: भारतरत्न डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त आणि वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून मुंबई विद्यापीठात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. मुंबई विद्यापीठाच्या ज्ञान स्त्रोत केंद्राच्या वतीने ज्ञान स्त्रोत केंद्राच्या नवीन इमारतीमध्ये ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

(फोटो सौजन्य : मुंबई विद्यापीठ)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ग्रंथालय व महितीशास्त्र विभागातील माजी वरिष्ठ प्राध्यापक डॉ. राजेंद्र कुंभार यांच्या हस्ते या ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी ज्ञान स्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. नंदकिशोर मोतेवार यांच्यासह विद्यापीठातील विद्यार्थी, विविध प्राधिकरणातील सदस्य, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. हे ग्रंथ प्रदर्शन १७ ते १९ ऑक्टोबर २०२३ सकाळी ११ ते ५ या कालावधीत खुले असणार आहे.

(वाचा : Mumbai University च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; राज्यस्तरीय आंतरविद्यापीठीय वक्तृत्व स्पर्धेत मुंबई विद्यापीठाचा पहिला नंबर)

वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून द्वितीय सत्रात ‘वाचनातून व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर डॉ. राजेंद्र कुंभार यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. वाचन हे व्यक्तिमत्व विकासास पुरक असून वाचनामुळे शब्दसंग्रह, लेखन कौशल्य, ज्ञानार्जन, सर्जनशीलता आणि विश्लेषणात्मक विचाराच्या विकासास मोठा हातभार लागत असल्याचे डॉ. राजेंद्र कुंभार यांनी सांगितले. व्यक्तिगत विकास विषयक ग्रंथ, कथा, कादंबरी, आत्मचरित्र, कविता, सेल्फ हेल्प बुक्स, नाविण्यता आणि सर्जनशीलता अशा विविध विषयांवर आज उत्कृष्ट ग्रंथ संपदा उपलब्ध आहे.

प्रत्येकाने त्याच्या आवडीनुसार ग्रंथांचे वाचन करावे. या वाचनाचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाला फायदा तर होणारच त्याचबरोबर त्याच्यात अनेकरूपाने बदलही घडून येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाविद्यालये आणि विद्यापीठात ‘बुक क्लब’ नावाने उपक्रम राबविल्यास अनेक विद्यार्थी वाचनाकडे वळू शकतील असेही त्यांनी सांगितले. डिजीटल माध्यमे आणि स्क्रीन टाईम अशा अनुषंगिक बाबींसदर्भात चिंता व्यक्त केली जात असतानाही लोक वाचनाकडे वळू लागले आहेत. सेल्फ हेल्प प्रकारातील विविध विषयांवरील पुस्तकांना अजूनही जगभरातून मोठी मागणी असल्याचे डॉ. राजेंद्र कुंभार यांनी सांगितले.

(वाचा : Mumbai University: मुंबई विद्यापीठात सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाची सुरुवात; दर तासाला १२०० लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया)

Source link

abdul kalams birth anniversarybooks exhibitiondr a p j abdul kalamevents at mumbai universitymumbaimumbai university books exhibitionmumbai university newsPune Universityreading inspiration day 2023university of mumbai
Comments (0)
Add Comment