इंडिया एक्झिम बँकेत भरती, जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील

Exim Bank Recruitment 2023: भारतीय निर्यात-आयात बँक म्हणजेच इंडिया एक्झिम बँक येथे भरती सुरू आहे. या भरती अंतर्गत व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदाच्या ४५ रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (डिजिटल तंत्रज्ञान), व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (बँकिंग ऑपरेशन्स), व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (राजभाषा), व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (प्रशासन) या पदांचा समावेश आहे.

या भरतीबाबत नुकतीच अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून ही अर्ज प्रक्रिया २१ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे तर १० नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरती प्रक्रियेतील पदे, पदसंख्या, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया याचे सर्व तपशील पाहूया.

‘इंडिया एक्झिम बँक भरती २०२३’ मधील पदे आणि पात्रता:
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (डिजिटल तंत्रज्ञान) – ३५ जागा
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (बँकिंग ऑपरेशन्स) – ०७ जागा
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (राजभाषा) – ०२ जागा
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (प्रशासन) – ०१ जागा
एकूण पदसंख्या – ४५ जागा

(वाचा: Mumbai University News: मुंबई विद्यापीठाचा महत्वपूर्ण सामंजस्य करार; विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे महाद्वार होणार खुले)

पात्रता: उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून/ विद्यापीठातून ६०% गुणांसह एमबीए/ पीजीडीबीए-फायनान्स किंवा सीए किंवा अभियांत्रिकी पदवी (बी.टेक./बी.ई.) किंवा बॅचलर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
(या व्यतिरिक्त विस्तृत पात्रता अधिसूचनेत दिलेली आहे. अधिसूचनेची लिंक खाली नमूद केली आहे. )

वयोमर्यादा: किमान २१ वर्षे आणि कमाल २८ वर्षे. कमाल वयोमर्यादेत ओबीसी प्रवर्गास ३ वर्षांची तर एससी/एसटी प्रवर्गास ५ वर्षांची सवलत आहे.

स्टायपेंड: ५५ हजार रुपये.

अर्ज शुल्क: या भरतीसाठी उमेदवारांना ६०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क आहे.

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: २१ ऑक्टोबर २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० नोव्हेंबर २०२३

निवड प्रक्रिया: परीक्षेद्वारे

या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘इंडिया एक्झिम बँक’ यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात सविस्तर अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरतीकरिता थेट अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे. अर्ज करताना आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. अपूर्ण अर्ज तसेच अंतिम मुदती नंतर म्हणजे १० नोव्हेंबर नंतर प्राप्त झालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

(वाचा: PMC Recruitment 2023: पुणे महानगरपालिकेत २८८ पदांची महारभरती! आजच करा अर्ज)

Source link

bank jobs 2023bank jobs newsExim bank bharti 2023EXIM Bank job vacancy 2023exim bank jobsEXIM Bank Recruitment 2023government jobsIndia Exim Bank RecruitmentIndia Exim Bank Recruitment 2023Job News
Comments (0)
Add Comment