पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन मध्ये १०० हून अधिक जागांसाठी भरती; जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील

Power Grid Corporation of India Limited Recruitment 2023: ‘पीजीसीआयएल’ म्हणजेच म्हणजेच पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे भरती सुरू आहे. या भरती प्रक्रिये अंतर्गत ‘अभियंता प्रशिक्षणार्थी’ या पदाच्या एकूण १८४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये इलेक्ट्रिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स या विभागांचा समावेश आहे.

या भरतीबाबत नुकतीच अधिसूचना जाहीर झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने करायचा असून १० नोव्हेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. तेव्हा या भरती मधील पदे, पदसंख्या, पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया याचे सर्व तपशील पाहूया.

‘पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
अभियंता प्रशिक्षणार्थी (Engineer Trainee)
इलेक्ट्रिकल – १४४ जागा
सिव्हिल – २८ जागा
इलेक्ट्रॉनिक्स – ०६ जागा
कम्प्युटर सायन्स – ०६ जागा
एकूण पद संख्या – १८४ जागा

(वाचा: CNP Nashik Recruitment 2023: चलन नोट मुद्रणालय नाशिक येथे १०० हून अधिक पदांसाठी भरती; पगारही आहे भरपूर)

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त उच्च शिक्षण संस्थेतून ६० टक्के गुणांसह संबधित विषयातील पूर्णवेळ अभियांत्रिकी बीई/ बीटेक/ बीएससी कम्प्युटर सायन्स पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा: कमाल २८ वर्षे

अर्ज पद्धती: ऑनलाइन

अर्ज शुल्क: ५०० रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० नोव्हेंबर २०२३

या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’ यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात सविस्तर अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरतीकरिता थेट अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे. अर्ज करताना अर्जासह आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. अपूर्ण अर्ज तसेच अंतिम मुदती नंतर म्हणजे १० नोव्हेंबर नंतर प्राप्त झालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

(फोटो सौजन्य – पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड)

(वाचा: MNC Nagpur Recruitment 2023: नागपूर महानगरपालिकेत भौगोलीक तज्ञ सल्लागारांची भरती; थेट मुलाखत पद्धतीने होणार निवड)

Source link

engineer trainee jobs 2023government jobsjob for engineersJob Newslatest job newsPGCIL bharti 2023PGCIL Recruitment 2023power grid corporation bharti 2023Power Grid Corporation of India Limited jobspower grid corporation recruitment 2023
Comments (0)
Add Comment