एकूण ७३ पदांसाठी ही भरती होणार असून त्यासाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून ०८ नोव्हेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीप्रक्रियेतील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन, वयोमर्यादा आणि अर्ज कसा करावा याचे सर्व तपशील जाणून घेऊया.
‘राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्था भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
तांत्रिक सहाय्यक – ६० जागा
प्रयोगशाळा परिचर – १३ जागा
एकूण पदसंख्या -७३ जागा
पात्रता:
तांत्रिक सहाय्यक – मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून संबधित विषयातील ६० टक्के गुणांसह पदवी/ पदव्युत्तर पदवी/ अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
प्रयोगशाळा परिचर – मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून ५० टक्के गुणांसह दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबधित कामाचा एक वर्ष अनुभव असणे गरजेचे आहे.
(या पदांची विस्तृत पात्रता अधिसूचनेत दिलेली आहे. अधिसूचनेची लिंक खाली नमूद केली आहे.)
(वाचा: AAICLAS Recruitment 2023: एएआय कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाईड सर्व्हिसेस मध्ये महाभारती! आजच अर्ज करा )
वेतनश्रेणी:
तांत्रिक सहाय्यक – ३५ हजार ४०० ते १ लाख १२ हजार ४०० रुपये.
प्रयोगशाळा परिचर – १८ हजार ते ५६ हजार ९०० रुपये
वयोमर्यादा:
तांत्रिक सहाय्यक – कमाल वयोमर्यादा ३० वर्षे
प्रयोगशाळा परिचर – कमाल वयोमर्यादा २५ वर्षे
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०८ नोव्हेंबर २०२३ (सायंकाळी ५.३० पर्यंत)
या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्था’ यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भात सविस्तर अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे. अर्ज करताना अर्जासह आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. अपूर्ण अर्ज तसेच अंतिम मुदती नंतर म्हणजे ०८ नोव्हेंबर नंतर प्राप्त झालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
(फोटो सौजन्य -राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्था )
(वाचा: MPSC Recruitment 2023: ‘एमपीएससी’ अंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभागात ३७८ पदांची महाभरती! आजच करा अर्ज)