सांगलीकरांसाठी शासनाचा रोजगार मेळावा; कधी, कुठे जाणून घ्या सर्व तपशील

सांगलीकरांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. सांगलीमध्ये शासनाच्या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमा अंतर्गत आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार योजनेद्वारे हा मेळावा होणार आहे. येत्या गुरुवारी २६ ऑक्टोबर रोजी हा रोजगार मेळावा होणार आहे.

सध्या राज्यातील प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हया-जिल्हया मध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम घेण्यात येतो. याच उपक्रमा अंतर्गत पंडित दीनदयाळ रोजगार योजना राबवली जात आहे. राज्यातील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी राज्य सरकारने एक हात पुढे केला आहे. यामध्ये रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून पात्र उमेदवारांची जागेवरच निवड केली जाते. ग्रामीण भागातील तरुणांना काम मिळावे यासाठी हे मोठे व्यासपीठ आहे. तेव्हा या रोजगार मेळाव्याची सविस्तर माहिती घेऊया.

या रोजगार मेळाव्यात मेळाव्यात ५० हून अधिक उमेदवारांना रोजगार देण्यात येणार आहे. यामध्ये मेकॅनिक, कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह, ऑफिस बॉय, सीएनसी / व्हीएमसी ऑपरेटर, लाइन इन्स्पेक्टर, वेल्डर, सेल्स क्लर्क, व्हीएमसी ऑपरेटर या आणि अशा अनेक पदांचा समावेश आहे. तसेच सांगलीमध्ये स्थित असलेल्या अनेक नामवंत कंपन्या या मेळाव्यात रोजगार देण्यासाठी सहभागी होणार आहेत.

(वाचा: AAICLAS Recruitment 2023: एएआय कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाईड सर्व्हिसेस मध्ये महाभारती! आजच अर्ज करा)

सांगली रोजगार मेळाव्याचे सर्व तपशील पुढीलप्रमाणे:

पदांची नावे: कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह, ऑफिस बॉय, सीएनसी / व्हीएमसी ऑपरेटर, मेकॅनिक, लाइन इन्स्पेक्टर, वेल्डर, कास्टिंग चेकिंग, सेल्स क्लर्क, व्हीएमसी ऑपरेटर, हेल्पर, लॅब वर्कर, प्रॉडक्शन सुपरवायजर यश अनेक पदे.

पद संख्या: ५० हून अधिक

शैक्षणिक पात्रता: प्रत्येक पदाची पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून त्याचे तपशील राज्य शासनाच्या संकेतस्थळावर दिले आहेत. त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.

नोकरी ठिकाण: सांगली

रोजगार मेळाव्याची तारीख: २६ ऑक्टोबर २०२३

रोजगार मेळाव्याचा पत्ता: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, विजयनगर, सांगली.

या रोजगार मेळाव्या करिता ऑनलाईन नोंदणी आवश्यक असून नोंदणीसाठी येथे क्लिक करा.

या रोजगार मेळाव्यातील सहभागी कंपन्या, पदे याची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

टीप: नोंदणी नंतर रोजगार मेळाव्यात उपस्थित राहायचे आहे. या मेळाव्यात ऑफलाईन पद्धतीने उमेदवारांची निवड केली जाईल.

(वाचा: MPSC Recruitment 2023: ‘एमपीएससी’ अंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभागात ३७८ पदांची महाभरती! आजच करा अर्ज)

Source link

Job Newssangli job fair 2023sangli latest newsSangli Rojgar Melava 2023रोजगार मेळावासांगली रोजगार मेळावा
Comments (0)
Add Comment