सैन्यासाठी शस्त्रे बनवण्यार्‍या कारखान्यात ११९ जागांवर भरती; मिळणार उत्तम पगार

Ordnance Factory Khamaria Recruitment 2023: भारत सरकार अंतर्गत येणार्‍या खमरिया ऑर्डनन्स फॅक्टरी मधील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर) पदांच्या तब्बल ११९ जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ नोव्हेंबर २०२३ आहे.

पदभरतीचा तपशील :

संस्था : ऑर्डनन्स फॅक्टरी, खमरिया (Ordinance Factory Khamaria, Madhya Pradesh)
पद संख्या : ११९ पदे
भरले जाणारे पद : कार्यकाळ आधारित DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

The General Manager, Ordnance Factory Khamaria District: Jabalpur Madhya Pradesh, Pin-482005

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ नोव्हेंबर २०२३

नोकरी करण्याचे ठिकाण : जबलपूर, मध्य प्रदेश

(वाचा : Central Bank of India Recruitment 2023 : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर पदावर भरती सुरु: पदवीधर करू शकतात अर्ज)

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

AOCP ट्रेड (NCTVT) चे माजी प्रशिक्षणार्थी ज्यांना ऑर्डनन्स फॅक्टरी प्रशिक्षण / लष्करी दारूगोळा आणि स्फोटकांच्या निर्मिती आणि हाताळणीचा अनुभव आहे. आणि पूर्वीच्या आयुध निर्माणी मंडळाच्या आयुध कारखान्यांमध्ये प्रशिक्षण घेतलेले AOCP ट्रेडचे एक्स-ट्रेड अप्रेंटिस.

परीक्षा शुल्क :

ऑर्डनन्स फॅक्टरी, खमरिया मधील भरतीसाठी आवश्यक परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही.

वयोमर्यादा :

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २० ऑक्टोबर २०२३ रोजी १८ ते ३५ वर्षांपर्यंत असावे. एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षांची सूट तर, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत ३ वर्षांची सूट देण्यात येईल.

मिळणार एवढा पगार :

सदर भरती प्रक्रियेच्या माध्यमातून निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १९ हजार ९०० रुपये पगार मिळेल + DA

काही महत्वाच्या लिंक्स :

अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहा. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी www.ddpdoo.gov.in येथे क्लिक करा.

(वाचा : IOCL Recruitment 2023 : इंडियन ऑइलमध्ये १७६० जागांवर महाभरती; दहावी, बारावी आणि आयटीआय पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी)

Source link

Government jobordnance factory khamariaordnance factory khamaria recruitment 2023खमरिया ऑर्डनन्स फॅक्टरीसरकारी नोकरीसैन्यासाठी शस्त्रे बनवणारी कंपनी
Comments (0)
Add Comment