राष्ट्रवादीला आव्हान देणार की जुळवून घेणार? उदयनराजेंच्या भूमिकेबाबत सस्पेन्स संपला!

हायलाइट्स:

  • जिल्हा बँक निवडणुकीत उदयनराजेंच्या भूमिकेची चर्चा
  • जिल्हा बॅंकेत पक्ष व राजकारणविरहीत निवडणूक होण्यासाठी उदयनराजे आग्रही
  • राष्ट्रवादीकडे करणार तीन जागांची मागणी?

सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या भूमिकेबाबत चर्चा सुरू आहे. मात्र जिल्हा बॅंकेत पक्ष व राजकारणविरहीत निवडणूक राहावी, अशी भूमिका उदयनराजेंनी घेतली आहे. तसंच ते राष्ट्रवादीकडे संचालकांच्या तीन जागांची मागणी करणार आहेत, अशीही माहिती आहे.

शुक्रवारी (ता. २७) होणाऱ्या बॅंकेच्या शेवटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर बॅंकेच्या निवडणुकीबाबत सर्व नेत्यांची एकत्रित बैठक होणार आहे. यामध्ये खासदार उदयनराजे भोसले संचालकांच्या जागांची मागणी करणार आहेत. त्यामुळे आजपर्यंत स्वत:ची एक जागा फिक्स करण्यापलीकडे लक्ष न देणाऱ्या उदयनराजेंची मागणी राष्ट्रवादीकडून मान्य होणार का, याकडे लक्ष आहे.

narayan rane: ”ते’ आत जाईपर्यंत गप्प बसणार नाही’; नारायण राणेंचा ‘या’ मंत्र्यांना इशारा

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक प्रक्रिया सुरू असून कच्ची मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतरच निवडणुकीच्या हालचाली गतीमान होणार आहेत. सध्यातरी इच्छुकांनी आपापल्या नेत्यांकडे मागणी करण्यास सुरुवात केली आहे. या सर्व प्रक्रियेत उदयनराजे भोसले यांची भूमिका काय राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. त्यांच्यापुढे दोन पर्याय होते. एकतर भाजपसोबत राहून त्यांच्या पॅनेलमध्ये सहभागी होणे किंवा राष्ट्रवादीच्या सर्वसमावेश पॅनेलमध्ये सहभागी होऊन आपली जागा फिक्स करणे, पण उदयनराजेंनी जिल्हा बॅंकेची निवडणूक सुरुवातीपासूनच सावधगिरीने घेण्याची तयारी केली आहे.

मागील निवडणुकीत उदयनराजे गृहनिर्माण आणि पाणीपुरवठा मतदारसंघातून निवडून आले होते. एका निवडणुकीत त्यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा याच मतदारसंघातून पराभव केला होता. आताची निवडणूक ही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. त्यामुळे ते उदयनराजेंबाबत कोणता निर्णय घेणार याची उत्सुकता आहे.

Source link

satara newsUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेजिल्हा बँकसातारा न्यूज
Comments (0)
Add Comment