‘सालार’ने ओपनिंगच्याच दिवशी रचला इतिहास, २०२३ च्या सर्व सिनेमांचे रकॉर्ड काढले मोडीत

मुंबई– प्रभासच्या बहुप्रतिक्षित ‘सालार’ने ओपनिंगच्या दिवशीच इतिहास रचला आहे. शुक्रवार, २२ डिसेंबर रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसचे आधीच्या सर्व सिनेमांचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. प्रशांत नील दिग्दर्शित ‘सालार’ हा २०२३ मधील सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला आहे. एवढेच नाही तर देशातील टॉप-१० सर्वात मोठ्या ओपनिंग झालेल्या सिनेमाच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आला आहे.

उत्साहाच्या भरात प्रभासच्या गालावर चाहतीनं मारली चापटी

या यादीत १० पैकी ४ चित्रपट प्रभासचे आहेत. २०२३ मध्ये आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या ओपनिंगचा रेकॉर्ड शाहरुख खानच्या ‘जवान’च्या नावावर होता, जो आता मोडला गेला आहे. इतकेच नाही तर गेल्या दोन आठवड्यांपासून सतत चर्चेत असलेल्या डंकी ‘सालार’पुढे शरण आला आहे.

गेले काही दिवस सतत ‘अ‍ॅनिमल’सिनेमातील हत्या आणि विध्वंस पाहून सोशल मीडिया गदारोळ माजला होता, पण आता त्याहून जास्त प्रतिसाद प्रभासच्या सिनेमाला मिळत आहे. राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शित केलेला डंकी ‘सालार’समोर टिकणार नाही हे अॅडव्हान्स बुकिंगमध्येच स्पष्ट झाले होते. डंकीने रिलीजपूर्वी १५.४१ कोटी रुपयांची अॅडव्हान्स बुकिंग केली होती, तर ‘सालार’ची अॅडव्हान्स बुकिंग कमी शो असूनही ४८.९४ कोटी रुपये झाली. मात्र, नंतर चित्रपटाची मागणी पाहता ‘सालार’चे शो आणि स्क्रीन काउंट आता वाढले आहे.

‘सलार’ने पहिल्या दिवशी विक्रमी ९५ कोटींची कमाई केली

sacnilk च्या अहवालानुसार, ‘सालार’ ने पहिल्या दिवशी देशात ९५.०० कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. हे सुरुवातीचे आकडे आहेत. ‘सालार’ आता देशभरात ६००० हून अधिक स्क्रीनवर दाखवला जात आहे. शुक्रवारनंतर आता ‘सालार’ शनिवारीही बंपर कमाई करणार आहे. दुसऱ्या दिवशीही १९ कोटी रुपयांचे अॅडव्हान्स बुकिंग झाले आहे.

‘आई कुठे काय करते’ मधला समृद्धी बंगला कुठे आहे माहितीये? मिलिंद गवळींनीच सांगितला पत्ता
‘सालार’चे शो सकाळपासून रात्रीपर्यंत हाऊसफुल्ल

शुक्रवारी सालारच्या मॉर्निंग शोमध्येही १०० पैकी ८८ जागांवर प्रेक्षक दिसले. तर रात्रीच्या शोमध्ये प्रेक्षकांची संख्या ९३% पर्यंत वाढली आहे. ‘सालार’चे बजेट २७० कोटी रुपये आहे.

‘सालार’ची कथा, आणि केजीएफ

‘सालार’ हा एक हाय अॅक्शन चित्रपट आहे. यात प्रभाससोबत पृथ्वीराज सुकुमारन, जगपती बाबू आणि श्रुती हसन यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट एका काल्पनिक शहराची कथा आहे, जिथे सत्तेसाठी संघर्ष होतो. हा सिनेमा केजीएफशी संबंधित असल्याचे बोलले जात होते मात्र प्रशांत नीलने प्रामाणिकपणे कबूल केले आहे की हा चित्रपट त्यांच्या २०१४ मध्ये रिलीज झालेल्या ‘उग्रामम’ च्या कथेपासून प्रेरित आहे.

बिग बॉस १६ फेम प्रियांका चहर चौधरीची तब्येत बिघडली, रुग्णालयातून फोटो समोर
शाहरुखच्या डंकीला वीकेंडला झटका बसू शकतो

‘सालार’ रिलीज होताच डंकीला बॉक्स ऑफिसवर फटका बसला आहे. ‘पठाण’ आणि ‘जवान’ नंतर, शाहरुखची २०२३ मध्ये ब्लॉकबस्टरची हॅटट्रिक हुकली. डंकीने गुरुवारी पहिल्या दिवशी २९.५० कोटी रुपयांची कमाई केली होती, तर शुक्रवारी त्याची कमाई २०.५० कोटींवर घसरली आहे.

सर्वात मोठ्या ओपनिंगची टॉप-१० यादी

देशात आतापर्यंत सर्वाधिक ओपनिंग डे कमाईचा विक्रम एसएस राजामौली यांच्या आरआरआरच्या नावावर आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर १३३ कोटी रुपये आणि जगभरात २२३ कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या क्रमांकावर प्रभासचा ‘बाहुबली २’ आहे, ज्याने देशात १२१ कोटी रुपये आणि जगभरात २१७ कोटी रुपये कमवले. तिसऱ्या स्थानावर प्रशांत नील आणि यशचा KGF२ आहे, या सिनेमाने पहिल्या दिवशी भारतात ११६ कोटी रुपये आणि जगभरात १५९ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. आता या चित्रपटात ‘सालार’ ९५ कोटींची कमाई करत चौथ्या क्रमांकावर दाखल झाला आहे. म्हणजेच टॉप-४ मध्ये प्रभासचे दोन आणि प्रशांत नीलचे २ चित्रपट आहेत. तर एसएस राजामौली यांचेही २ चित्रपट आहेत. पण शाहरुखचा ‘पठाण’ टॉप-१० च्या यादीतून काढून टाकण्यात आला आहे.

Source link

dunki moviesalaar moviesalaar movie box office reportshah rukh khanडंकी सिनेमाप्रशांत नील सिनेमाशाहरुख खानसालारसालार बॉक्स ऑफिस कलेक्शन
Comments (0)
Add Comment