सदर भरती प्रक्रिया तब्बल ६७० रिक्त जागांसाठी होणार असून, यासाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रभर असणार आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकच्या माध्यमातून सदर भरतीसाठी उमेदवारांनी २१ डिसेंबर २०२३ ते १० जानेवारी २०२४ पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत.
पदभरतीचा तपशील :
भरले जाणारे पद : जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट ब (अराजपत्रीत)
एकूण रिक्त जागा : ६७० जागा
शैक्षणिक पात्रता :
जलसंधारण अधिकारी गट ब (अराजपत्रीत) पदासाठी अर्ज करणार्या उमेदवाराने शासनाने मान्यता दिलेली ३ वर्ष कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका (Diploma in Civil Engineering) किंवा पदवी (Degree in Civil Engineering) किंवा शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषीत केलेली अर्हता
आवश्यक पात्रता :
भारतीय नागरिकत्व
वयोमर्यादा गणण्याच्या दिनांक हा प्रस्तुत जाहिरात प्रसिद्धीचा दिनाक असेल.
वयोमर्यादा :
० जाहिरातीमध्ये नमुद केलेल्या जलसंधारण अधिकारी गट ब पदासाठी अर्ज करणार्या उमेदवारचे वय १९ वर्ष असावे.
० खुल्या प्रवर्गातील कमाल ३८ वर्षापेक्षा (मागासवर्गीयांसाठी ४३ वर्षांपेक्षा) जास्त नसावे.
० दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत ४५ वर्षांपर्यंत
० पात्र खेळाडूंच्या बाबतीत ४३ वर्षांपर्यंत
० अनाथ उमेदवारांच्या बाबतीत ४३ वर्षांपर्यंत
अर्जाचे आणि परिक्षेचे वेळापत्रक :
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याची तारीख : २१ डिसेंबर २०२३ पासून
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याचा शेवटचा दिवस : १० जानेवारी २०२४ (रात्री ११.५९ वाजेपर्यंत)
- ऑनलाइन पद्धतीने परिक्षा शुल्क भरण्याची मुदत : २१ डिसेंबर २०२३ ते १० जानेवारी २०२४ पर्यंत
- परिक्षेसाठी ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची तारीख : परिक्षेच्या ७ दिवस आधी
परिक्षेच्या दिनांक, वेळ व परिक्षाकेंद्र प्रवेशपत्रामध्ये नमुद केले जाईल,
संभाव्य बदला मृद व जलसंधारण विभागाच्या वेबसाइटवर माहिती प्रसारीत केली जाईल.
अर्ज शुल्काविषयी :
सदर भरती अंतर्गत अर्ज करणार्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गासाठी १००० रुपये तर, राखीव प्रवर्गासाठी ९०० रुपये अर्ज शुल्क आकारले जाणार आहे.
उपरोक्त परिक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.
परिसखा शुल्क ना-परतावा असेल
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :
- उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेली लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहे.
- उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायची आहेत.
- अर्जामध्ये सद्यस्थितीत चालू असलेला स्वतःचा ईमेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
महत्त्वाच्या लिंक्स :
महाराष्ट्र शासन, मृदा व जलसंधारण विभागाच्याभरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
महाराष्ट्र शासन, मृदा व जलसंधारण विभागाच्या भरती अंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.