ओएनजीसीमध्ये सल्लागार पदावर नोकरीची संधी; जाणून घ्या अर्जाविषयी सर्व तपशील

ONGC Jobs Openings 2024 : ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ONGC) मध्ये रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नोकरीच्या निमित्ताने तुम्हाला सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुम्हाला या संस्थेत काम करायची इच्छा असेल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. या भरती मोहिमेअंतर्गत, ONGC ने कनिष्ठ आणि सहयोगी सल्लागारांच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून ती लवकरच संपणार आहे. या भरतीशी संबंधित सर्व महत्त्वाचे तपशील येथे पहा…

अनेक पदे भरली जाणार :

ONGC च्या भरती सूचनेनुसार एकूण १२ रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ही भरती करारावर आधारित आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी फक्त काही दिवसांचा अवधी आहे.

अर्जासाठी पात्रता :

कनिष्ठ सल्लागार (E3 स्तर) आणि सहयोगी सल्लागार (E4 ते E5 स्तर) या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे अधिकृत अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे संबंधित पात्रता असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा :

कनिष्ठ आणि सहयोगी सल्लागार पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार जाहिरात प्रकाशित करताना ६५ वर्षांपेक्षा कमी असावेत.

मिळेल एवढा पगार :

कनिष्ठ सल्लागार (E3) : पहिले वर्ष – रु २७,०००, दुसरे वर्ष – रु २८,३५०
सहयोगी सल्लागार (E4 आणि E5) : पहिले वर्ष – रु ४०,००० दुसरे वर्ष – रु ४२,०००
वाहन खर्च – रु. २,००० प्रति महिना
निवासस्थान कार्यालयीन खर्च – सचिव शिपायासाठी दरमहा ६,५०० रु.

अशा प्रकारे केली जाईल निवड :

उमेदवारांना ONGC भर्ती २०२४ साठी शॉर्टलिस्ट केले जाईल. यानंतर निवडलेल्या उमेदवारांना ईमेलद्वारे कळवले जाईल. निवड प्रक्रियेचा भाग म्हणून उमेदवारांना लेखी परीक्षा आणि मुलाखत उत्तीर्ण करावी लागेल.

अर्ज कसा करावा :

उमेदवारांनी त्यांच्या अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून ड्रिलिंग सेवा विभागाला kumar_vinod12@ongc.co.in वर ईमेल पाठवावा लागेल.
याशिवाय, दिलेल्या अर्जाच्या नमुन्यातील फॉर्म भरा आणि स्कॅन केलेल्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.

पत्ता – खोली क्रमांक ४०, दुसरा मजला, केडीएम भवन, मेहसाणा इस्टेट

Source link

government jobs 2024oil and natural gas corporationongc job vacancyongc jobs openings 2024ongc recruitment 2024ओएनजीसीओएनजीसी नोकरीओएनजीसी नोकरी २०२४सरकारी नोकरी
Comments (0)
Add Comment