हायलाइट्स:
- सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजची मान्यता नामंजूर
- खासदार विनायक राऊतांची टीका
- नारायण राणेंवर अप्रत्यक्षरित्या टीका
सिंधुदुर्गः जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला नॅशनल मेडिकल कमिशनकडून आलेली मान्यता अचानक रद्द करण्यात आली आहे. प्रस्तावात त्रूटी दाखवून त्याच्या पूर्ततेसाठी तीन आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. यावरुन शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच, अप्रत्यक्षरित्या केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर टीका केली आहे.
सिंधुदुर्गातील शासकीय मेडिकल कॉलेजला १७ तारखेला केंद्रीय एनएमसी कमिटी मान्यता देते आणि लगेच दोन दिवसात २१ तारखेला जुनियर कमिटी त्रुटी दाखवून मान्यता नामंजूर करते. या दोन दिवसात काही लोकांच्या दिल्लीत झालेल्या गाठीभेटीतून झालेला हा प्रकार असून चांगल्या कामात काड्या घालण्याचा हा प्रकार आहे, असा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे.
वाचाः विश्वास नांगरे पाटीले हे महाविकास आघाडीचे माफिया, सोमय्यांचा आरोप
वैयक्तिक स्वार्थासाठी स्वतःच्या मेडिकल कॉलेजवर गंडांतर येणार आहे. त्यामुळे त्यांनी काड्या घालण्याचा प्रयत्न केला आहे. काड्या घालायच्या तर त्यांनी घालू दे मात्र आम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोणत्याही परिस्थितीत मंजूर करून घेणार म्हणजे घेणारचं, असे ठाम मत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी घेतलेल्या पञकार परिषदेत मांडल आहे.
वाचाः विश्वास नांगरे पाटीले हे महाविकास आघाडीचे माफिया, सोमय्यांचा आरोप
३० ऑक्टोबर पर्यत विमानाचे बुकिंग हाऊसफूल
सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळाचे ९ ऑक्टोबरला उद्घाटन होत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत यांनी चिपी विमानतळाची अधीका-यांसह पाहणी केली व उदघाटन बाबत आढावा घेतला. सिंधुदुर्गवासीयांचा उदघाटनपूर्वी चांगला प्रतिसाद पाहता अजून एक विमान सुरू करण्याचा प्रयत्न आहे. ते विमान सकाळी किंवा संध्याकाळचे असेल त्याचा वेळ ठरायचा आहे. तर ३० ऑक्टोबर पर्यत विमानाचे बुकिंग हाऊसफूल झाल्याची माहीती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.
वाचाः राहुल गांधींनी अध्यक्षपद सोडल्यानंतर काँग्रेस नेतृत्वहीन; राऊतांनी दिला ‘हा’ सल्ला