Narendra Modi : मोदी ३.० पर्वाला उद्यापासून सुरवात होणार, दिल्ली हाय अलर्टवर, शपथविधीनिमित्त ‘या’ गोष्टी असणार खास

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजधानी दिल्ली येथे रविवार (९ जून) रोजी पंतप्रधानपदाचा शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे. नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. या सोहळ्यादरम्यान, दिल्लीत सुरक्षा कशी राहणार? कोणते मुद्दे सोहळ्याला खास बनवणार जाणून घेऊ..

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावर काम करणारे कामगार राहणार उपस्थित

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावर काम करणारे कामगार, स्वच्छता कर्मचारी तसेच ट्रान्सजेंडर समुदायातील लोकांनाही पंतप्रधान मोदींच्या शपथविधी कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय ‘वंदे भारत’ आणि ‘मेट्रो’ ट्रेनवर काम करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना आणि केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांना विकसित भारताचे राजदूत म्हणून निमंत्रण पाठवण्यात आले आहे.
Rahul Gandhi : काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचा ‘जय-जयकार’, लोकसभेतील विरोधी पक्षनेते बनण्याचा घ्यावा ‘पुढाकार’

सुरक्षा कशी असणार?

१) राष्ट्रपती भवनाच्या आजूबाजूच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त असणार आहे. त्याचबरोबर तीन स्तरामध्ये सुरक्षा असणार असल्याचे सांगण्यात आले आहे. एनएसजी कमांडो देखील तैनात राहणार आहेत. तसेच संपूर्ण दिल्ली हाय अलर्टवर राहणार आहे.

२) दिल्ली पोलिसांनी दिल्ली पुढील काही दिवसांसाठी नो-फ्लाय झोन म्हणून घोषित केली आहे. याचा अर्थ ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट-कंट्रोल एअरप्लेन आणि बलून यांसारख्या उडत्या विमानांवर बंदी घालण्यात आली आहे.

३) भारताच्या शेजारील बांगलादेश, श्रीलंका, भूतान, नेपाळ, मॉरिशस आणि इतर देशांचे राष्ट्रप्रमुख पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या पाहुण्यांना त्यांच्या हॉटेलपासून कार्यक्रमस्थळापर्यंत नेण्यासाठी विशेष मार्ग असणार आहेत.

एनडीए ने २९२ जागा जिंकल्या

दरम्यान, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीने २९२ जागा जिंकल्या आहेत. तर इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकल्या. तर इतरांना १७ जागा मिळाल्या आहेत. २०१९ प्रमाणे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. त्यामुळे आता बहुमताच्या जोरावर एनडीए आघाडी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे.

Source link

lok sabha election 2024Modi 3.0Narendra Modinarendra modi newsशपथविधी सोहळा
Comments (0)
Add Comment