Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Marine Drive : मुंबईचा कायापालट होणार! दुसरे मरीन ड्राइव्ह मिळणार, सीएम शिंदेंनी मांडला शहराचा विकास आराखडा
मुंबईत बीपीटीच्या सहा एकर जागेचा योग्य वापर करुन त्याठिकाणी मरीन ड्राइव्ह सारखी चौपाटी व्हावी असा राज्य सरकारचा मानस आहे. याच प्रक्लपासाठी राज्य शासनाला केंद्राकडून मदत मिळावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी आज केंद्राच्या नीति आयोगाच्या बैठकीत केली आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून तिच्या सौंदर्यकरणाला त्यामुळे बळ मिळेल असेही सीएम शिंदे पुढे म्हणाले. आता सध्या रेसकोर्सवरील जागेवर सुद्धा मुंबईकरांच्या दृष्टीने एक मोठे पार्क उभारण्यात येणार आहे. मुंबई सारख्या शहरात पर्यटकांचा कल सुद्धा वाढेल असा विश्वास शासनाला आहे.
मुंबईची गती आणखी वाढणार!
पायाभूत सुविधांना अधिक वेग द्यावा ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला कॅबिनेटची अंतिम मंजूरी मिळावी तसेच लाखो रहिवाशांना दिलासा देण्यासाठी. तसेच दहिसर अंधेरीतल्या पुनर्विकास प्रकल्पांसाठी फनेल रडार झोन शिफ्ट करावा अशी मागणीही सीएम शिंदे यांनी नीति आयोगाच्या बैठकीत केली आहे.
झोपडपट्ट्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास होणार
क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून मुंबई महानगर परिसर क्षेत्रातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींसाठी मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास योजना सुरू केल्या आहेत. हा आशियातील सर्वात मोठा ब्राउनफील्ड प्रकल्प आहे असे सीएम शिंदे म्हणाले. ही योजना आपल्या नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे सीएम शिंदे म्हणाले. मुंबईतील झोपडपट्ट्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास राज्य सरकारच्या संस्थांमार्फत करण्यात येणार असून या संस्थांमार्फत दोन लाखांहून अधिक घरे बांधण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.