Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
गावात मोठ्या प्रमाणत वारकरी संप्रदाय असल्याने दरवर्षी गावातून पंढरपूरला वारी निघते. यामध्ये कुंभार ही सहभागी होतात. यंदा ही ते गावातून ६ जुलै ते १४ जुलै दरम्यान पायी दिंडी निघाले. या दिंडीतही ‘महाराज’ हा कुत्रा कुंभार यांच्यासोबत वारीतून चालत पंढरपूरकडे निघाला. तब्बल २२५ किलोमीटरचं अंतर वारकऱ्यांसोबत या श्र्वानानेही पूर्ण केलं. मात्र पंढरपुरात जाताच लाखोंच्या गर्दीत हा श्वान हरवला. पंढरपुरात कुंभार कुटुंबीयांनी दोन दिवस आपल्या लाडक्या कुत्र्याला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र रिकाम्या हातानेच त्यांना घरी परतावं लागलं. सुमारे २२५ अंतर पूर्ण करून वारीत गेलेला कुत्रा न मिळाल्याने कुंभार कुटुंबीय हताश झाले होते.
दरम्यान, गावातीलच गावकऱ्यांनी याबाबतची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली होती. गेली आठवडाभर कुत्र्याचा शोध घेण्याचं काम सुरू होतं. मात्र दोनच दिवसांपूर्वी ‘महाराज’ कुत्रा एकटाच गावी परतला. हरवलेला लाडका कुत्रा घरी परतलेला बघून कुंभार कुटुंबीयांचा आनंदाला पारावर उरला नाही. गावकऱ्यांनी तर या कुत्र्याची गावातून जंगी मिरवणूकच काढली. गावी परतलेल्या या कुत्र्याचे हार घालून पूजन केलेले फोटो सोशल मीडियावर मात्र तुफान व्हायरल झाले. प्रत्येकाने विठ्ठलानेच पाळीव कुत्र्याला वाट दाखवली अशा भावना सीमाभागासह कोल्हापूर जिल्ह्यात व्यक्त झाल्या.