Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

२५ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका, लाखो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली, पीक पाहणी अहवालातून माहिती उजेडात

10

म.टा. प्रतिनिधी, मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे जवळपास १ लाख ३८ हजार २६२.५४ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची माहिती मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या निमित्ताने समोर आली आहे. यात एकूण १२७ तालुके बाधित झाले असून २५ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला असल्याची माहिती पीक पाहणी अहवालाच्या माध्यमातून उजेडात आली आहे. यात भात, नाचणी, सोयाबीन, कापूस आणि भाजीपाल्यांची पिके बाधित झाली आहेत. मुख्य म्हणजे, अतिवृष्टीमुळे सर्वाधिक फटका हा कोल्हापूर जिल्ह्याला बसला आहे. अतिवृष्टीमुळे राज्यातील सुमारे ४८६.९१ हेक्टर क्षेत्र जमीन खरडून गेले असल्याचेही समोर आले आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचा यंदाचा पीक पाहणी अहवाल सादर करण्यात आला असून, या अहवालात ही माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार राज्यात १ जून ते २९ जुलै या कालावधीत सरासरीच्या तुलनेत १३० टक्के पाऊस पडला असल्याची नोंद करण्यात आली. सोमवारपर्यंत एकूण १३६ हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाच्या पीक पेरणी करण्यात आली आहे. हे प्रमाण ५ वर्षांच्या तुलनेतील सरासरी लक्षात घेता हे प्रमाण १२८ टक्के आहे.
Rain Alert: रायगड, रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट; कोकण, घाटमाथ्यावर उद्यापासून पाऊसजोर, कसे असेल आजचं हवामान?
अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्गातील भाताचे पीक बाधित झाले असून, सुमारे १४४०.४० हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रायगड जिल्ह्यातील ३०२७.८१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, तेथेही भाताचे पीक बाधित झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सुमारे ११ हजार १६३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, येथील कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, केळीची पीके बाधित झाली आहेत. गडचिरोली येथील ११ हजार ४८० हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, येथील भात, कापूस, सोयाबीन, तूर आणि भाजीपाल्यांची पिके बाधित झाली आहेत.
जावळीच्या रांजणीवर भूस्खलनाचा धोका, घोटेघर-सुलेवाडीतील डोंगराला मोठमोठ्या भेगा, लोकांचा जीव मुठीत

सर्वाधिक पेरणी तेलबियांची

पीक पाहणी अहवालानुसार राज्यात २९ जुलैपर्यंत पीकनिहाय खरीप पेरणीची आकडेवारी लक्षात घेता सर्वाधिक तेलबियांची ११६ टक्के पेरणीची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ कापसाची ९६ टक्के, अन्नधान्य ७८ टक्के आणि तृणधान्य ७३ टक्के असे पेरणीचे प्रमाण नोंदवले आहे. हेक्टरनुसार राज्यात ५०.९ लाख हेक्टर जागेवर तेलबियांची पेरणी नोंदविली आहे. त्यापाठोपाठ अन्नधान्य ४३.९ लाख हेक्टर, कापूस ४०.५ लाख हेक्टर आणि तृणधान्य २५.२ लाख हेक्टर प्रमाण असल्याचे या अहवालानुसार समोर आले आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी १५६ लाख शेतकरी

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत २९ जुलैपर्यंत १५६ लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. तर राज्यातील एकूण १०४ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित असल्याची माहिती पुढे आली आहे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी ३१ जुलै ही अंतिम मुदत आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.