Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Gondavalekar Maharaj Thoughts : श्री सद्गगुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे ”साधकांसाठी सुविचारांची सत्संगति”
Gondavalekar Maharaj : ब्रह्मचैतन्य ज्यांना गोंदवलेकर महाराज म्हणूनही ओळखले जाते. हे भारतीय हिंदू संत आणि आध्यात्मिक गुरु होते. ब्रह्मचैतन्य हे हिंदू देवता रामाचे भक्त होते आणि त्यांनी “ब्रह्मचैतन्य रामदासी” असे नाव दिले. त्यांनी आध्यात्मिक प्रगती आणि मुक्ती मिळविण्यासाठी रामाच्या त्रयोदशाक्षरी मंत्र सह जप ध्यानाचा सल्ला दिला. जाणून घेऊया त्यांचे अनमोल विचार
Gondavalekar Maharaj Suvichar In Marathi :
१) आपला सर्व प्रपंच, मी व मी चा विस्तार, आपला मालकी हक्क सोडून सद्गुरुंच्या चरणी अर्पण केल्यामुळे त्यातल्या काळज्या, चिंता बऱ्याचशा कमी होऊन मोकळे झालेले मन नामाकडे वळविणे सोपे जाते. परमार्थात अपयश नाही.
२) विकार आणि वासना नाहीशा होत नाहीत, पण त्यात परिवर्तन होऊन त्यांना योग्य ते वळण दिले जाऊ शकते. कुत्र्याला तुकडा घातल्याप्रमाणे त्यांना योग्य ती जागा दाखवावी.
३) प्रपंचात मी अमूक म्हणून कोणी नाही, परमार्थात मी अमूक म्हणून कोणी नाही हे पक्के ओळखून दृढ निष्ठेने नामस्मरण करणे हेच माझे कर्तव्य आहे, असे सतत मनाला बजावत जावे.
४) साधकाच्या जीवनात एक दिवस एक वेळ अशी यावी की नामस्मरण करणे हे पुण्य आहे असे न वाटता, नामस्मरण न करणे हे पाप आहे असे वाटावे.
५) विषय सोडण्याचा अभ्यास करण्याऐवजी नाम धरण्याचा अभ्यास करावा म्हणजे साधते. विषयांपेक्षा विषयांचे चिंतन जास्त घातक असते, कारण त्यात माणूस त्या विषयाला मनाने चिकटतो.
६) शरणागती २ प्रकारची आहे. एक अंतरंग व एक बहिरंग. अंतरंग शरणागतीमध्ये नामस्मरण, राम कर्ता, राम इच्छा, सद्गुरु आज्ञापालन ह्या गोष्टी येतात तर बहिरंग शरणागतीमध्ये कर्तव्यपालन, जनप्रियत्व, निरासक्ती, निःस्वार्थी प्रेम, वासनाशून्यता, तितिक्षा इ. गोष्टींचा समावेश होतो. शरणागतीचे फळ म्हणजे गुरुकृपा व गुरुकृपेला या जगात काहीही अशक्य नाही. शांतता, समाधान, आनंद या गोष्टी गुरुकृपेबरोबरच येतात.
७) कर्तृत्वाचा अहंकार व फळाची इच्छा टाकून ईश्वरार्पण बुध्दीने कर्म केले म्हणजे ते बाधत नाही. हाच गीतेतील निष्काम कर्मयोग.
८) शिष्य हीन गुणांचा वृक्ष असला तरी सद्गुरुंच्या उपदेशाचे सबीज नामाचे कलम त्याच्यावर केले म्हणजे तो हीन वृक्ष सुध्दा अतिमधुर, सुरस फळ देतो.
९) हठयोग देहापासून, राजयोग मनापासून सुरुवात करतो, पण नामस्मरणाचे साधन देवापासूनच सुरुवात करते. ईश्वर होत होत तो ईश्वराची चढती वाढती भक्ती करीत राहतो.
१०) आई जशी तान्ह्या मुलाचे आपल्या दुधावर पोषण करते, त्याचप्रमाणे सद्गुरु आपल्या अध्यात्मिक शक्तीने शिष्याचे पोषण करतात.