Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

राज ठाकरेंचा स्वबळाचा आवाज घट्ट, मनसेचे दोन उमेदवार जाहीर, थेट भाजपच्या मतदारसंघातच पहिला धमाका

8

मुंबई : विधानसभा निवडणुका जाहीर होण्यासही अद्याप बराच काळ बाकी आहे. मात्र त्याआधीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. मनसेचे नेते आणि राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक बाळा नांदगावकर यांना शिवडी विधानसभा मतदारसंघातून तिकीट जाहीर करण्यात आलं आहे. तर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकांना किमान दोन ते तीन महिन्यांचा अवधी आहे, तर निवडणुकांचे बिगुल वाजण्यासही अवकाश आहे. मात्र त्याआधीच मनसेने दोन शिलेदार जाहीर करत आघाडी घेतली आहे. शिवडी विधानसभा मतदारसंघातून २००९ मध्ये आमदार राहिलेल्या बाळा नांदगावकर यांना राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा तिकीट दिलं आहे.

शिवडी विधानसभा मतदारसंघ सध्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे आहे. पक्षाचे प्रतोद अजय चौधरी येथून आमदार आहेत. त्यामुळे शिवडीतून तिहेरी लढत होण्याचे संकेत मिळत आहेत.
Raj Thackeray : आदित्य ठाकरेंविरोधात वरळीत उमेदवार देणार का? पुतण्याचं नाव निघताच राज ठाकरे म्हणाले…
दुसरीकडे, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे समाधान आवताडे विजयी झाले होते. त्यांच्याविरोधात उमेदवार देत राज ठाकरेंनी स्वबळाचा आवाज घट्ट केला आहे. सोबतच महायुतीच्या पर्यायावरही काट मारली आहे. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकांत तिहेरी लढती होण्याचे संकेत मिळत आहेत.
Sanjay Raut : तुम्हारे जैसे कुत्ते भौकते है, शेर खुलेआम ठोकते है, माझा नेता उद्धव ठाकरे, नादी लागू नका, संजय राऊतांची डरकाळी
दरम्यान, वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मनसेचा उमेदवार शड्डू ठोकणार हेही जवळपास निश्चित मानले जात आहे. वरळीमधून कोण उभं राहतंय, यांच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही, आमचा उमेदवार निश्चित आहे, लवकरच यादी समोर येईल असं राज ठाकरे यांनी सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हणाले.

याआधी, राज ठाकरे यांनी २०० ते २२५ जागा लढवण्याची घोषणा केली होती. मात्र किमान १५० जागांवर उमेदवार उतरवण्याची राज ठाकरेंची तयारी पक्की दिसते.

राज ठाकरे यांनी ४ ऑगस्टपासून राज्यभरात नवनिर्माण यात्रा काढण्याची घोषणा शुक्रवारी केली. या दौऱ्याची सुरुवात सोलापूर येथून होणार असून सांगता छत्रपती संभाजी नगर येथे होणार आहे. या दौऱ्यात राज ठाकरे संबंधित जिल्ह्यातील निरीक्षक आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.