Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

योगायोग की नशिब; जिथे जन्माला आला तिथेच मृत्यू झाला, मारोतीची मन सुन्न करणारी कहाणी

5

निलेश झाडे, चंद्रपूर: घरची स्थिती बेताची असल्याने नऊ महिन्याच्या गर्भवती आईला मजुरीला जावं लागलं. तिथेच तिला प्रसूतीकळा सुरु झाल्या आणि तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्या परिसरात हनुमानाचे प्राचीन मंदिर असल्याने त्याचे नाव मारोती ठेवलं गेलं. या घटनेला ४२ वर्ष झालीत. रविवारी मारोती त्याच परिसरात ट्रॅक्टरने शेतात चिखल करायला गेला. तिथे अपघात झाल्याने त्याचा दुदैवी मृत्यू झाला आहे. जिथे जन्म झाला तिथेच काळाने त्याच्यावर झडप घातली. मारोती बापू मेक्रतीवार असे मृर्तकाचे नाव आहे. ऐन सणाचा दिवशी मारोतीच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या धाबा या गावाची ओळख संतनगरी अशी आहे. या गावातील मारोती उर्फ तामदेव बापू मेक्रतीवार हे ट्रॅक्टर चालक आहेत. रविवारी जामबूरावचा सण होता. या दिवशी शेतीचे कामे बंद ठेवलं जातं. मात्र, ट्रॅक्टर मालकाने मारोती यांना त्याला शेतात चिखल करायला पाठवलं. चिखल करताना ट्रॅक्टर चिखलात रुतलं. रुतलेल्या ट्रॅक्टरला बाहेर काढण्यासाठी दुसरं ट्रॅक्टर बोलवण्यात आलं.
Kolhapur Crime: हात-पाय बांधून विष पाजलं, १७ दिवसांनी कोल्हापूरच्या जवानाचा मृत्यू, पत्नी-बॉयफ्रेंडवर गुन्हा
त्यानंतर रुतलेल्या ट्रॅक्टरला दोर बांधून दुसऱ्या ट्रॅक्टरने ओढण्याचा प्रयत्न करत असताना दोर तुटला आणि रुतलेलं ट्रॅक्टर पलटी झालं. त्यात ट्रॅक्टरच्या खाली दबल्याने मारोतीचा दुदैवी मृत्यू झाला. ज्या परिसरात मारोतीच्या मृत्यू झाला होता, त्याच परिसरात त्याचा जन्म झालेला होता. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.

कुटुंब एकाकी पडलं

मारोती चार वर्षांचा असताना आई सुशीलाबाई यांचा मृत्यू झाला. करोनात त्यांचे वडीलसुद्धा गेले. यांच्या पश्चात पत्नी कुंदाबाई, मुलगी अश्विनी, मुलगा आशुतोष असं कुटुंब आहे. आनंदात जगणाऱ्या कुटुंबावर काळाने दुःखाचे विरजन ओतले आहे.

मूर्खपणा नडला

चिखलात रुतून बसलेल्या ट्रॅक्टरला काढण्यासाठी दुसरी ट्रॅक्टर बोलावली गेली. केवळ दोरीच्या मदतीने ट्रॅक्टर ओढण्याच्या मूर्खपणा मालकाने केला. ट्रॅक्टर ओढताना दोरी तुटली आणि ट्रॅक्टर पलटली. यात मारोती यांचा मृत्यू झाला. मालकाच्या एका चुकीने मारोती यांना जीव गमवावा लागला.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.