Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कारवाईवरुन टोलवाटोलवी! गणेशोत्सव मिरवणुकीतील ध्वनिप्रदूषण कारवाईकडे MPCB, पालिका, पोलिसांचे दुर्लक्ष

10

म. टा. प्रतिनिधी, पुणे : गणेशोत्सवापूर्वीचा सराव, उत्सवात आणि विसर्जन मिरवणूक मार्गांवर होणारा ढोल-ताशांचा दणदणाट, स्पीकरच्या भीतींच्या कर्कश्श आवाजामुळे संपूर्ण शहरात सर्रास आ‌वाजाची पातळी मर्यादेच्या पलिकडे नोंदवली जाते आहे. प्रशासनाकडून त्यांच्या नियमित नोंदीही घेतल्या जात आहेत. मात्र, उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करायची कोणी? या वरून प्रशासकीय यंत्रणांमध्ये दर वर्षीप्रमाणे यंदाही ‘टोलवा टोलवी’ सुरू झाली आहे. एकमेकांच्या जबाबदाऱ्यांवर बोट ठेवण्याची भूमिका ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांच्या पथ्यावर पडते आहे.

गणेशोत्सवामध्ये गणेश मंडळाच्या मिरवणुकांमधील पारंपरिक वाद्यांची संख्या, स्पीकरकची संख्या पाच वर्षांपूर्वीच सर्व प्रशासकीय यंत्रणांनी एकत्र येऊन निश्चित केली आहे. रात्री दहानंतर आवाजावर निर्बंधही घालण्यात आले आहेत. उत्सवापूर्वी गणेश मंडळांबरोबर होणाऱ्या बैठकांमध्ये दर वर्षी महापालिका आणि पोलिसांकडून नियमांची उजळणी केली जाते. आवाजाची मर्यादा ओलांडल्यास, गरजेपेक्षा जास्त वाद्यांचा वापर, स्पीकर वाढविल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही दिला जातो. मात्र, प्रत्यक्ष मिरवणुकीदरम्यान दर वर्षी कर्कश्श आ‌वाजामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होते. स्पीर्करच्या भींतींएवढाच आवाज, ढोल-ताशाच्या दणदणाटातून नोंदविण्यात येतो आहे. प्रशासनासमोरच नियमांचे उल्लंघन होत असताना, आतापर्यंत मंडळ आणि ढोल-ताशा पथकांवर हातावर मोजण्याए‌वढेदेखील गुन्हे दाखल झालेले नाही. याबाबत पर्यावरणप्रेमी स्वंयेसवी संस्थांच्या प्रतिनिधींनी चौकशी केली असता, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी), पोलिस विभाग आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून एकमेकांच्या विभागांकडे जबाबदारी असल्याची उत्तरे त्यांना ऐकायला मिळत आहेत. उत्सवादरम्यान होणाऱ्या मध्यवर्ती भागातील मोठे चौक, मुख्य मिरवणूक मार्गांवरील आवाजाच्या चोवीस तास नोंदी घेतल्या जातात, मग कारवाई का होत नाही, असा प्रश्न सर्वासामान्यांना पडला आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणते…

‘उत्सवामध्ये ध्वनिप्रदूषणांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पंचनामा करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या पूर्वीच आवाजाची मोजणी कशी करावी, याचे प्रशिक्षण पोलिसांना दिले आहे. त्यांच्याकडे ध्वनिमापक मशिनही उपलब्ध आहेत. त्यांनी पंचनामा करून आमच्याकडे कागदपत्र जमा केल्यानंतर आम्ही संबंधितांवर गुन्हा दाखल करून न्यायालयासमोर पुढील बाजू मांडतो. आम्ही थेट पंचनामा करीत नाही. काही हॉटेल व्यावसायिकांनी आवाजाची मर्यादा ओलांडल्याने पोलिसांनी त्यांच्या विरोधात पंचनामे केले आणि आमच्याकडे २६ प्रकरणे पाठवली होती. आम्ही पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. गणेशोत्सवात अशी प्रकरणे आल्यास आम्ही निश्चितच पुढची कार्यवाही करू,’ असे स्पष्टीकरण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पुणे विभागीय अधिकार रवी आंधळे यांनी दिली.

पोलिस म्हणतात…

‘ध्वनिप्रदूषणाच्या प्रकरणात कारवाईचे अधिकार प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलिस अशा दोन्ही यंत्रणांना देण्यात आले आहेत. डीजे किंवा ढोल-ताशा पथकांवरील कारवाई केवळ पोलिसांनीच करावी, असे म्हणणे संयुक्तिक ठरणार नाही. पोलिसांनी यापूर्वीही अनेकदा कारवाई केलेली आहे,’ असे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी सांगितले.

उत्सवापूर्वीचा सराव

महिनाभर आधीच शहरात नदीपात्रामध्ये मांडव टाकून आणि उपनगरांमध्ये ढोल-ताशा पथकांकडून सराव सुरू होतो. मात्र, गेल्या चार वर्षांपासून हा सराव त्या भागातील स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरतो आहे. दररोज संध्याकाळी सलग तीन-चार तास ८० ते ९० डेसिबल आवाज कानावर आदळत असल्याने त्यांची चिडचिड होते आहे. ‘सीओईपी’ तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र संशोधन विभागातील विद्यार्थ्यांकडून सरावाच्या ठिकाणी होणाऱ्या आवाजांचीही नोंद घेण्यात आली आहे. त्यानुसार सरासरी गणेश मंदिर (राजाराम पूल) ७५, एस. एम. जोशी पुलाखालील सराव ९५, भिडे पूल (नदीपात्र) ८४, ओंकारेश्वर येथील आवाज ८४ डेसिबलच्या पुढेच नोंदविण्यात येत आहे.
Hit And Run: पुन्हा हिट अँड रन! भरधाव स्कॉर्पिओची धडक, बाइकसह तरुण दूरवर फेकला गेला अन् पाटील कुटुंबाने लेक गमावला
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने शहराच्या कोणत्या भागात किती आवाजाची पातळी असावी, याचे निकष निश्चित केलेले आहेत. हॉस्पिटल, शैक्षणिक संस्था म्हणजेच शांतता क्षेत्र असो, की व्यावसायिक क्षेत्र वर्षभर येथील आवाजाची पातळी निकषांच्या पुढेच नोंदवली जाते, असा निष्कर्ष पुणे महापालिकेच्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालामध्ये देण्यात आला आहे.

ध्वनिप्रदूषणाची मर्यादा सकाळी ६ ते रात्री १० रात्री १० ते सकाळी ६
औद्योगिक क्षेत्र ७५ ७०
व्यावसायिक क्षेत्र ६५ ५५
निवासी क्षेत्र ५५ ४५
शांतता क्षेत्र ५० ४०

गणेश विसर्जन मिरवणुकीतील गेल्या वर्षीची निरीक्षणे

– गेल्या दहा वर्षांत एकाही चौकात सरासरी पातळी १२० डेसिबलच्या पुढे नोंदवली गेली नव्हती.
– यंदा सर्वच चौकांमध्ये रात्री आठनंतर ११० डेसिबलच्या पुढे आवाज गेला, अनेक ठिकाणी १२०च्या पुढे होता.
– बहुतांश ठिकाणी खंडुजीबाबा चौकात आवाजाने अतिधोकायक पातळी नोंदवली.

उच्चांक गाठलेले चौक (आवाज डेसिबलमध्ये)
चौकाचे नाव रात्री आठ सकाळी आठ

गणपती चौक ११६ ११६
लिंबराज चौक १११ १२५.६
कुंटे चौक ११४.२ ११८.९
कुंटे चौक १२६.९ ११८.९
उंबऱ्या चौक १०७.२ १२०.८
गोखले चौक ११७.३ ११५.४
शेडगे चौक ११८.५ ११६
टिळक चौक ११९.१ ११७.८

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.