Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

साप्ताहिक टॅरोकार्ड राशीभविष्य १२ ते १८ ऑगस्ट२०२४: २ राशींच्या व्यवसायात भरभराटी! पैशांचा अपव्यय टाळा, टॅरो कार्डनुसार कसा असेल हा आठवडा

9

Weekly Tarot Card Horoscope 12 to 18 August 2024: टॅरो कार्डनुसार आपल्याला भविष्यातील अनेक घटना सहज कळतात. या आठवड्यात अनेक शुभ संयोग आणि ग्रहांचे संक्रमण होत आहे. त्यामुळे काही राशींना आर्थिक फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक मेहनत करावी लागेल. नातेसंबंध सुधारतील. अनेक नवीन संधी मिळतील. ग्रहांच्या संक्रमणामुळे काही राशींना नोकरीच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागेल.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
साप्ताहिक टॅरोकार्ड राशीभविष्य १२ ते १८ ऑगस्ट२०२४: २ राशींच्या व्यवसायात भरभराटी! पैशांचा अपव्यय टाळा, टॅरो कार्डनुसार कसा असेल हा आठवडा
Tarot Card Prediction :
टॅरो कार्डनुसार आपल्याला भविष्यातील अनेक घटना सहज कळतात. या आठवड्यात अनेक शुभ संयोग आणि ग्रहांचे संक्रमण होत आहे. त्यामुळे काही राशींना आर्थिक फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक मेहनत करावी लागेल. नातेसंबंध सुधारतील. अनेक नवीन संधी मिळतील. जवळच्या व्यक्तीकडून तुम्हाला निराशा मिळू शकते. अनुभवातून खूप काही शिकाल. कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्याने जीवनात आनंद येईल. पैशांचा अपव्यय टाळा. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. भविष्यात तुमचे जुने संपर्क फायदेशीर ठरतील. जोडीदारच्या तब्येतीची काळजी घ्या. मेष ते मीन राशींसाठी टॅरो कार्डनुसार येणारा आठवडा कसा असेल जाणून घेऊया.

मेष

मेष राशीसाठी टॅरो कार्डनुसार हा आठवडा अधिक आक्रमक असेल. वैवाहिक जीवनात वाद होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक मेहनत करावी लागेल. नातेसंबंध सुधारतील. अनेक नवीन संधी मिळतील.

वृषभ

टॅरो कार्डनुसार वृषभ राशीसाठी हा आठवडा उपजीविकेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना सहकाऱ्यांशी समन्वय साधावा लागेल. जवळच्या व्यक्तीकडून तुम्हाला निराशा मिळू शकते. अनुभवातून खूप काही शिकाल.

मिथुन

मिथुन राशीचे लोक कामासोबत आरोग्यावर अधिक लक्ष केंद्रित करतील. कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्याने जीवनात आनंद येईल. पैशांचा अपव्यय टाळा. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा.

कर्क

टॅरो कार्डनुसार कर्क राशीचे लोक यशाच्या शिखरावर पोहोचतील. तुमचे लव्ह लाईफ अधिक मजबूत होईल. जोडीदारासोबत तुमचे संबंध चांगले राहातील. विजयाच्या मार्गावर तुम्ही राहाल. कामात अनेक संधी मिळतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासात अधिक लक्ष द्यावे.

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी टॅरो कार्डनुसार हा आठवडा भाग्याचा असेल. आयुष्यात प्रगतीचे अनेक नवीन मार्ग खुले होतील. भविष्यात तुमचे जुने संपर्क फायदेशीर ठरतील. जोडीदारच्या तब्येतीची काळजी घ्या.

कन्या

टॅरो कार्डनुसार कन्या राशीच्या लोकांना या आठवड्यात बाहेर जावे लागेल. घराच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी. कुटुंबात कोणाशी तरी वाद होऊ शकतो. प्रेम व्यक्त करण्यात घाई करु नका. आर्थिक स्थिती समाधानकारक राहिल.

तुळ

टॅरो कार्डनुसार तुळ राशीच्या लोकांना मुलांमध्ये अधिक रस असेल. व्यवसायात नवीन करार होतील. कायदेशीर बाबींमध्ये निष्काळजीपणा टाळा. प्रयत्न आणि सहकार्यामुळे अनुकूलता प्राप्त होईल. नवीन संबंध फायदेशीर ठरतील. आर्थिक योजना राबवल्या जातील. नवीन काम मिळण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना सावध राहा.

वृश्चिक

टॅरो कार्डनुसार या आठवड्यात वृश्चिक राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा थोडा त्रासदायक असेल. कामाच्या ठिकाणाहून लाभ होईल. दिखाऊपणापासून दूर राहा. नवीन योजना अंमलात आणा.

धनु

टॅरो कार्डनुसार हा आठवडा धनु राशीच्या लोकांसाठी कामात अधिक व्यस्त असणार आहे. एखाद्या नातेवाईकाच्या आजारपणामुळे चिंतेत सापडाल. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला असेल.

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी कौटुंबिक जीवनात मध्यम असेल. कुटुंबात वैचारिक मतभेद वाढतील. नात्यात तणावाचा सामना करावा लागू शकतो. आरोग्याच्या बाबतीत बेफिकीर राहू नका. आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ

टॅरो कार्डनुसार हा आठवडा लव्ह लाईफच्या बाबतीत कमजोर असू शकतो. प्रेमसंबंधांच्या बाबतीत नात्यात दूरावा येईल. कोणताही निर्णय घेताना तो संयमाने किंवा शहाणपणाने घ्यावा. आत्मविश्वासाचा अभाव राहिल.

मीन

टॅरो कार्डनुसार हा आठवडा मीन राशीच्या लोकांमध्ये नातेसंबंधात विचारांची कमतरता जाणवेल. कामाच्या ठिकाणी संबंध बिघडू शकतात. त्यामुळे आत्मविश्वास खचू शकतो.

कोमल दामुद्रे

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.