Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

भाईगिरी करत टपरी चालकाला मारहाण, पोलिसांनी चोप चोप चोपला, गावगुंडाचा हात जोडून माफीनामा

10

प्रशांत श्रीमंदिलकर, पुणे (पिंपरी) : पिंपळे गुरवमधील एका गावगुंडाने टपरी चालकाला मारहाण करून हप्ता घेतल्याचा व्हिडीओ समोर आला. आरोपीने एवढ्यावरच न थांबता सदर व्हिडीओ इन्स्टाग्रामला शेअर केला. पोलिसांनी काहीच तासांत आरोपीला शोधून त्याला असा बदडला की आरोपी हात जोडून माफी मागू लागला. माझ्याकडून चूक झाली, असा प्रकार मी पुन्हा कधीही करणार नाही, तुम्हीही करू नका, असा सामाजिक संदेश तो केविलवाण्या सुरात देऊ लागला.

पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव भागामध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. नकुल गायकवाड असे गावगुंडाचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चांगलाच चोप दिला. तसेच त्याचे मुंडन करून त्याच्याकडून माफीनामा देखील घेतला. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
धावत्या दुचाकीवर प्रेमी युगुलाचे अश्लील चाळे; व्हिडिओ व्हायरल, नागरिकांकडून संताप व्यक्त

पोलिसांनी चोपल्यावर हात जोडले, म्हणतो- माझी चूक झाली, माफ करा…

याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपळे गुरव परिसरामध्ये नकुल गायकवाड या गावगुंडाने एका टपरी चालकाला दमदाटी करत त्याच्याकडून हप्ता वसूल केला. तसेच त्याला शिवीगाळ करत मारहाण करून या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला.


याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नकुल गायकवाड या आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवला. त्यानंतर त्याचे मुंडन देखील केले. केलेल्या कृत्याचा त्याच्याकडून माफीनामा घेतला. या व्हिडीओमध्ये गावगुंड हात जोडून उभा होता. माझ्याकडून चुकीचा प्रकार घडला. पुन्हा असा प्रकार माझ्याकडून होणार नाही. तुम्हीही असे कृत्य कधी करू नका, असे आवाहन त्याने भुरट्या भाईंना आणि त्याच्या साथीदारांना केले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.