Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) ने मुंबईतील विविध गृहप्रकल्पातील २०३० सदनिकांची सोडत नुकतीच जाहीर केली आहे. म्हाडाच्या घरांना वाढता प्रतिसाद पाहता सायबर ठगांनीही संधीचा पुरेपूर गैरफायदा घेण्यास सुरुवात केली आहे. सायबर चोरांनी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळाशी नामसाधर्म्य असणारे बनावट अनधिकृत संकेतस्थळ तयार केले असून या माध्यमातून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. याबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेत म्हाडा प्रशासनातर्फे वांद्रे कुर्ला येथील सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे.काही अज्ञात व्यक्तींनी म्हाडाच्या https://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळासारखे दिसणारे हुबेहूब बनावट अनधिकृत संकेतस्थळ mhada.org या नावे तयार केले आहे. बनावट संकेतस्थळाचे होम पेज, पत्ता व पहिल्या पानावरील संकेतस्थळाची रचना म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळासारखीच आहे. मात्र, या बनावट संकेतस्थळावर अर्ज प्रक्रिया न राबवता थेट पेमेंटचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. म्हाडाचे घर मिळवून देण्याचे आश्वासन देत हे संकेतस्थळ तयार करणाऱ्यांनी काहींना लिंक पाठवून त्यांच्याकडून अनामत रक्कम स्वीकारली. याच संकेतस्थळावरून बनावट पावतीही उपलब्ध करून दिल्याचा प्रकार घडला आहे.
घरांच्या सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्याकरिता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्ज नोंदणी करावी. सोडत प्रणालीमध्ये पात्र ठरलेले अर्जदारच संगणकीय सोडतीत सहभाग घेऊ शकतील. अशाप्रकारे संगणकीय सोडतीच्या माध्यमातूनच म्हाडा सदनिकांचे वितरण केले जाते. याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारे म्हाडाच्या सदनिकांचे वितरण केले जाऊ शकत नाही, याबाबत नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी केले आहे.
अशी ओळखा मूळ वेबसाइट
म्हाडाच्या संगणकीय सोडतीसाठी IHLMS 2.0 ही संगणकीय सोडत प्रणाली वापरण्यात येत आहे. ही प्रणाली अत्यंत सोपी, सुलभ, सुरक्षित आणि महत्वाचे म्हणजे पूर्णता ऑनलाइन आहे व यामुळे ही प्रणाली मानवी हस्तक्षेपास वाव देत नाही. म्हाडाच्या सोडत प्रणालीमध्ये अर्जदारांची नोंदणी प्रक्रिया झाल्यावर त्यांचे कायमस्वरूपी प्रोफाइल तयार होते. या प्रोफाइलमध्ये अर्जदार आपले कागदपत्र सादर (upload) करतील. या कागदपत्रांची प्रणालीद्वारे पडताळणी केली जाते व पात्र कागदपत्रांनुसार अर्जदाराची पात्रता निश्चिती केली जाते. यानंतरच अर्जदार सोडतीसाठी अर्ज करू शकतील व अर्ज भरल्यानंतरच अनामत रकमेचा भरणा करण्याबाबतचा पर्याय या प्रणालीमध्ये उपलब्ध होतो. मात्र, फसवणूक झालेल्या व्यक्तीने ही कोणतीही प्रक्रिया न राबविता थेट अज्ञात व्यक्तींद्वारे कळविण्यात आलेल्या रकमेचा भरणा या बनावट संकेत स्थळावर केल्याचे समजले आहे.