Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Shravan 2024 : आनंदात…तांडवात डमरूच्या तालावर नृत्य ! शंकराजवळ का असतो डमरू? चमत्कारीक डमरू मंत्र माहित आहे का?

12

Damru Mahatva Aani Labh: हिंदू धर्मातील देवीदेवतांप्रमाणे भगवान महादेवाजवळ एक वाद्ययंत्र आहे, ते म्हणजे डमरू. हा डमरू त्यांनी त्रिशुळाला बांधलेला आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का की भगवान महादेवाजवळ डमरू कसा आला आणि त्याचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे? या डमरू संदर्भात मंत्र जोडलेला आहे. हा अद्भूत मंत्र तुम्हाला संकटातून बाहेर काढू शकतो. चला जाणून घेऊ.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Shravan 2024 : आनंदात…तांडवात डमरूच्या तालावर नृत्य ! शंकराजवळ का असतो डमरू? चमत्कारीक डमरू मंत्र माहित आहे का?
Damru Kai Aahe: डमरू हे भगवान शंकराचे आवडते वाद्य मानले जाते. भगवान शिव जेव्हा आनंदात असतात तेव्हा डमरूचा वापर करतात ते अगदी तांडव करतानाही डमरु वापरतात. म्हणून असे सांगितले जाते की, शिवशंकराला प्रसन्न करायचे असेल तर डमुरू वाजवायला हवा. भगवान शिव यांच्या स्वरूपाशी ज्या ज्या गोष्टी जोडलेल्या आहेत, त्या सर्वांना आध्यात्मिक महत्त्व आहे. डमरू हे सामान्य वाद्य नसून त्याचा संबंध सृष्टीची निर्मिती आणि प्रलय याच्याशी संबंध आहे. या डमुरूबद्दल अधिक माहिती या लेखात जाणून घेऊया.

डमरू वाद्यामुळे प्रकृतीमध्ये नवी ऊर्जा

पौराणिक मान्यतेनुसार भगवान शिव डमरूसह प्रकट झाले होते. जेव्हा सृष्टीची निर्मिती झाली, तेव्हा जगात ध्वनी नव्हता. ज्या वेळी माता सरस्वती प्रकट झाल्या तेव्हा सृष्टीमध्ये ध्वनीचा संचार झाला पण स्वर आणि ताल याशिवाय हा ध्वनी संगीत याचा काहीच उपयोग नव्हता. तेव्हा भगवान शिवाने नृत्य करत १४ वेळ डमरू फिरवला, त्यातून ध्वनीचे व्याकरण, संगीतातून छंद आणि ताल यांची निर्मिती झाली. डमरूच्या आवाजानेच संसारात चंचलता आली. असे मानले जाते की, जेव्हा शिव डमरू वाजवून तांडव नृत्य करतात तेव्हा प्रकृतीमध्ये नव्या ऊर्जेचा संचार होतो आणि सृष्टी दुःख आणि पीडा यातून बाहेर पडते. जेव्हा भोलेनाथ साधनेमध्ये असतात तेव्हा डमरू त्यांच्या त्रिशुळाला बांधलेला असतो. तर जेव्हा ते आनंदित असतात तेव्हा ते स्वतः डमरू वाजवत नृत्य करतात.

डमरू मंत्र काय आहे?

डमरू मंत्र हे खरे तर डमरूच्या आवाजातून निघणारे शब्द आहेत जे आपल्याला आवाजाच्या रूपात ऐकू येतात. हे शब्द एका वाक्यात टाकून डमरू मंत्र बनवला आहे शास्त्रांनुसार पाहिले तर या मंत्राचा वापर सप्तऋषींनी आयुर्वेदिक उपायात वापरण्यासाठी केला होता. या मंत्राचा एकेएक ध्वनी भगवान महादेवाने डमरूतून निर्मिला आहे, आणि त्याचे परिवर्तन मंत्रांच्या शब्दात झाले आहे.

डमरू वाद्यामुळे प्रकृतीमध्ये नवी ऊर्जा

पौराणिक मान्यतेनुसार भगवान शिव डमरूसह प्रकट झाले होते. जेव्हा सृष्टीची निर्मिती झाली, तेव्हा जगात ध्वनी नव्हता. ज्या वेळी माता सरस्वती प्रकट झाल्या तेव्हा सृष्टीमध्ये ध्वनीचा संचार झाला पण स्वर आणि ताल याशिवाय हा ध्वनी संगीत याचा काहीच उपयोग नव्हता. तेव्हा भगवान शिवाने नृत्य करत १४ वेळ डमरू फिरवला, त्यातून ध्वनीचे व्याकरण, संगीतातून छंद आणि ताल यांची निर्मिती झाली. डमरूच्या आवाजानेच संसारात चंचलता आली. असे मानले जाते की, जेव्हा शिव डमरू वाजवून तांडव नृत्य करतात तेव्हा प्रकृतीमध्ये नव्या ऊर्जेचा संचार होतो आणि सृष्टी दुःख आणि पीडा यातून बाहेर पडते. जेव्हा भोलेनाथ साधनेमध्ये असतात तेव्हा डमरू त्यांच्या त्रिशुळाला बांधलेला असतो. तर जेव्हा ते आनंदित असतात तेव्हा ते स्वतः डमरू वाजवत नृत्य करतात.

डमरूतून ॐ शब्दाची उत्पत्ती

असे मानले जाते की प्रदोष काळात भगवान शिव कैलास पर्वतावर डमरू वाजवतात आनंदमग्न होऊन नृत्य करतात. भगवान महादेवाच्या डमरूला नादसाधनेचे प्रतीक मानले जाते. नाद म्हणजे जो ध्वनी ज्याला आपण ओम म्हणतो. महादेवाच्या डमरूतूनच ॐ शब्दाची उत्पत्ती झाली होती, यालाच ब्रह्मांडाचा ध्वनी म्हटले जाते. डमरूच्या ध्वनीरा वीर रसाचा ध्वनी असेही म्हटले जाते.

डमरू मंत्र अशा प्रकारे आहे –

अइउण्‌, त्रृलृक, एओड्, ऐऔच, हयवरट्, लण्‌, ञमड।णनम्‌, भ्रझभञ, घढधश्‌, जबगडदश्‌, खफछठथ, चटतव, कपय्‌, शषसर, हल्‌।
भगवान शिवाची पूजा केल्यानंतर ११ वेळा डमरू मंत्राचाा जप केल्याने आजारी व्यक्ती बरी होते असे म्हणतात. जर एखाद्या प्राण्याची विषबाधा झाली असेल आणि या मंत्राचा न थांबता जप केला तर विषाचा परिणाम कमी होतो. डमरू मंत्राच्या जपाने नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव, नजर दोष नष्ट होतो, अशी मान्यता आहे.

ध्यान-तांत्रिक साधनेत डमरूचा वापर

डमरूचा वापर आदि शंकराचार्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढवण्यासाठी केला होता. डमरूचा वापर भगवान शिवाचा संध्याकाळातील ध्वनीच्या रूपात केला जातो. याचा वापर महादेवाचे ध्यान आणि तांत्रिक साधनेत केला जातो.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.