Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Devi Laxmi Story : सदैव तिचा आशिर्वाद सोबत राहो, त्या माता लक्ष्मीची जन्मकथा ! माता लक्ष्मीचे आई-वडिल कोण?, जाणून घ्या
Mata Laxmi Birth Story : हिंदू धर्मात माता लक्ष्मी ही पैशांची, धनाची आणि ऐश्वर्याची देवी मानली जाते. लक्ष्मी ही विष्णूची पत्नी आहे. जगातली प्रत्येक व्यक्ती माता लक्ष्मीची आराधन करतो. माता लक्ष्मीचा आशिर्वाद सैदव आपल्यावर राहावा असे प्रत्येकाला वाटत असते. या धनलक्ष्मीची उत्पत्ती अर्थात जन्म कसा झाला याबद्दल तुम्हाला माहित आहे का? पुराणात लक्ष्मीमातेच्या जन्माबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. या लेखात जाणून घेऊया. लक्ष्मीची उत्पत्ती कशी झाली? तिच्या आईवडिलांचे नाव काय आहे?
समुद्रमंथनातून माता लक्ष्मीचा जन्म
एका पौराणिक कथेनुसार, देवी लक्ष्मीची कथा ऋषी दुर्वासा आणि इंद्र देव यांच्या भेटीपासून सुरू होते. एकदा दुर्वासा ऋषी मोठ्या आदराने इंद्राला फुलांचा हार अर्पण करतात. इंद्र देव तो हार घेतात आणि विनम्रतेने आपल्या गळ्यात घालण्याऐवजी, त्यांचे वाहन ऐरावत हत्ती याच्या गळ्यात घालतात. ऐरावत तो हार जमिनीवर टाकून देतो. दुर्वास ऋषी हे पाहून क्रोधीत होतात आणि अहंकारी इंद्र देवाला श्राप देतात, मी दिलेला पवित्र हार तू जमीनीवर टाकून त्याचा सर्वनाश केलास, याचप्रमाणे तुझ्या राज्याचा सर्वनाश होईल.
दुर्वास ऋषींच्या शापामुळे स्वर्गलोक लक्ष्मीविहीन झाला. स्वर्गलोकाचे ऐश्वर्य नष्ट झाल्याने दैत्यांनी त्याचा लाभ घेतला आणि स्वर्गावर आक्रमण केले. या युद्धात देवतांचा पराभव झाला. कारण दुर्वास ऋषींच्या शापामुळे देवतांच्या शक्ती नष्ट झाल्या होत्या. इंद्र देवाला आपली चूक लक्षात आली पण आता वेळ निघून गेली होती. इंद्र देव मदतीसाठी ब्रह्मदेवाकडे आले.
ब्रह्मदेवाच्या सल्ल्याने इंद्र भगवान विष्णूकडे मदत मागण्यासाठी गेले. यावर भगवान विष्णूंनी देवतांना समुद्रमंथन करण्याचा सल्ला दिला. तसं पाहिलं तर देव आणि दानव कधीच एकत्र आले नाहीत पण समुद्रमंथनासाठी दोघांमध्ये समेट झाली. समुद्रमंथनातून १४ रत्ने बाहेर आली त्या एका रत्नाच्या रुपात लक्ष्मीचा जन्म झाला. या विविध रत्नांचे देव आणि राक्षसांनी वाटप करून घेतले. भगवान विष्णूने लक्ष्मीला आपल्या अर्धांगिनीच्या रूपात स्वीकारले. तेव्हापासून लक्ष्मीला विष्णू पत्नी किंवा विष्णू वल्लभा असे म्हटले जाते. समुद्रमंथनापासून उत्पन्न झाल्यामुळे सिंधुसुता हेही एक नाव तिला देण्यात आहे.
भृगु ऋषी आणि ख्याती यांची कन्या
एक कथेनुसार समुद्र मंथनातून लक्ष्मी मातेचा जन्म झाला असे सांगतात तर दुसऱ्या कथेत विष्णुप्रिया लक्ष्मीचा उल्लेख आहे. विष्णुप्रिया हिचे आईवडील आहेत, ज्यांचा समुद्रमंथनाशी कोणताही संबंध नाही. एका कथेनुसार लक्ष्मी ही भृगू ऋषी आणि त्यांची पत्नी ख्याती यांची कन्या आहे. माता लक्ष्मीचा जन्म शरद पौर्णिमेच्या दिवशी झाला. ही कन्या सर्वगुण संपन्न असल्याने हिचे नाव लक्ष्मी ठेवण्यात आले. या कथेत लक्ष्मी मातेचे दोन भाऊ देखील आहेत
धाता आणि विधाता अशी त्यांची नावे असून अलक्ष्मी नावाची बहिण देखील आहे. ऋषी भृगू राजा दक्षचे भाऊ आणि सप्तर्षि आहेत. अशा प्रकारे लक्ष्मी ही माता सतीची बहीणसुद्धा आहे.
माता लक्ष्मीचा विवाह
असे सांगितले जाते की, लक्ष्मीने भगवान विष्णूला पतीच्या रूपात प्राप्त करण्यासाठी समुद्रकिनारी तपस्या केली होती. हजारो वर्षांच्या तपस्येनंतर त्यांची परीक्षा घेण्यासाठी इंद्रदेव प्रकट झाले. इंद्र देवाने विष्णूचे रूपे घेतले, जेव्हा इंद्रदेवाने लक्ष्मीला वर मागण्यास सांगितले, तेव्हा लक्ष्मीने विष्णूच्या रूपातील इंद्राला विश्वरूपाचे दर्शन घडवण्याची विनंती केली. पण इंद्रदेव विश्वरूपाचे दर्शन घडवण्यात असमर्थ होते, त्यामुळे इंद्रदेव तेथून निघून आले. त्यानंतर भगवान विष्णू स्वतः प्रकट झाले. विष्णूने लक्ष्मीला वर मागण्यासाठी सांगितले. लक्ष्मीच्या या प्रार्थनेवर विष्णूने विश्वरूपाचे दर्शन घडवले आणि लक्ष्मीच्या इच्छेनुसार भगवान विष्णूने त्यांना पत्नी म्हणून स्वीकारले. त्यानंतर एका स्वयंवरात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा विवाह झाला. अशा प्रकारे माता लक्ष्मी या भगवना विष्णु यांच्या पत्नी बनल्या.
माता लक्ष्मीचे अवतार
माता लक्ष्मीने लोकांच्या कल्याणासाठी प्रत्येक युगात वेगवेगळे अवतार घेतलेले आहेत. असे म्हणतात जेव्हा जेव्हा भगवान विष्णु यांनी पृथ्वीवर अवतार घेतला तेव्हा माता लक्ष्मी त्यांच्या पत्नीच्या रूपात अवतरली होती, सतयुगात भगवान विष्णूने श्री राम अवतार गेतला तेव्हा मात लक्ष्मी यांनी सीतेच्या रुपात अवतार घेतला. त्याच युगात माता लक्ष्मीने भगवान परशुराम यांची पत्नी धरणी या रूपाने जन्म झाला होता. द्वापर युगात, माता लक्ष्मी राणी रुक्मिणी, कृष्णाची पत्नी आणि पद्मा म्हणून अवतरली होती, अशा प्रकारे माता लक्ष्मीच्या जन्माची कथा अतुलनीय आहे आणि ती नेहमी संपत्तीची देवी म्हणून पूजली जाते.