Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महाराष्ट्र हादरला! गतिमंद महिलेवर सामुहिक बलात्कार, बसस्थानकातील प्रसाधनगृहात अत्याचार; व्हिडिओ केला व्हायरल
Woman Assaulted In Chandrapur: चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथे एका गतीमंद महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेतील ५ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. ही घटना १२ ऑगस्ट २०२४ च्या मध्यरात्रीची आहे. पिडित महिला एकटी असल्याचे पाहून तिला आरोपींनी बसस्थानकातील प्रसाधनगृहात नेले आणि बळजबरीने अत्याचार केला. हा अत्याचार सुरू असतानाच दुसऱ्याने चित्रीकरण केले आणि चित्रफीत तयार केली. ही चित्रफीत यातील एका आरोपीने मित्राला पाठविली. या मित्राने ही चित्रफीत समाज माध्यमावर व्हायरल केली आणि शहरात एकच खळबळ उडाली आहे.
Ajit Pawar: महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांचे xxx…; दादांनी हातवारे करून सांगितलं, अत्याचार करणाऱ्यांच परत धाडस झालं नाही पाहिजे!
यासंदर्भात येथील काही सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत आज ( शुक्रवार ) उपविभागीय अधिकारी दिनकर ठोसरे यांना निवेदन देऊन आरोपींना त्वरित अटक करून कारवाई करण्याची मागणी केली. चित्रफीतीत दिसणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून काही तासात पाच आरोपींना अटक केली असून भारतीय दंड संहितेच्या कलम ६४ (२), (क), ७०(१) ८७, १२६(२), ३ (५) सहकलम ६७,(अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पोलिसांनी पिडित महिलेचा शोध घेऊन तिला वैद्यकीय तपासणीसाठी चंद्रपूर येथे पाठवले आहे.
Maharashtra Bandh: उद्याचा बंद बेकायदेशीर! मुंबई उच्च न्यायालयाचा महाविकास आघाडीला दणका; बंद केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश
दरम्यान पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन,अतिरिक्त पोलिस अधीक्षक रीना जनबंधू यांनी नागभीड येथे भेट दिली. तपासासंदर्भात मार्गदर्शन केले. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार काचोरे करीत आहेत.
महाराष्ट्र हादरला! गतिमंद महिलेवर सामुहिक बलात्कार, बसस्थानकातील प्रसाधनगृहात अत्याचार; व्हिडिओ केला व्हायरल
पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे झालेल्या घटनेनंतर महाराष्ट्रात गेल्या १० दिवसांपासून महिला आणि लहान मुलींवर अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या घटनांवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे आणि यासाठी महाविकास आघाडीकडून उद्या २४ ऑक्टोबर रोजी बंदची हाक देण्यात आली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने हा बंद बेकायदेशीर असल्याचे सांगितले. त्यानंतर महाविकास आघाडीने बंद मागे घेत तोंडावर काळी पट्टी बांधून मूक आंदोलन करणार असल्याचे सांगितले.