Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

काठीवाला दादा, मुलीने सगळं सांगितलं, पण एका गोष्टीमुळे शिक्षिकेचा गैरसमज, त्या दिवशी काय घडलं?

5

कल्याण : बदलापूर येथील शाळेत दोन चिमुरड्यांबाबत लैंगिक शोषणाची पहिली घटना १३ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. जेव्हा पहिल्या पीडितेने तिच्या पालकांना याची माहिती दिली, तेव्हा पालकांनी शाळेशी संपर्क साधला. मुलीने सांगितले की, “हातात काठी घेणाऱ्या दादाने” तिच्याशी वाईट वर्तन केले. वर्गशिक्षक आणि मुख्याध्यापकांनी शाळेतील प्रत्येकाला मुलीसमोर हजर केलं, परंतु आरोपी त्या दिवशी गैरहजर होता. दुसऱ्या दिवशी, मुलगी पुन्हा त्या आरोपीला ओळखू शकली नाही. त्यामुळे शिक्षिकेला वाटलं, की घटना इतरत्र घडली असावी.

१३ ऑगस्ट रोजी दुसऱ्या पीडितेच्या आजोबांना पहिल्या मुलीसोबत झालेल्या घटनेची माहिती मिळाली. दुसऱ्या पीडितेनेही तीन दिवस शाळेत जाण्यास नकार दिला होता. ती पहिल्या पीडितेच्या जवळची होती. आजोबांनी १५ ऑगस्ट रोजी मुलीची वैद्यकीय तपासणी केली. अहवालात लैंगिक शोषणाची पुष्टी झाली. आजोबांनी आपल्या मुलीला याबाबत माहिती दिली. तिने १६ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका नेत्याच्या मदतीने पोलिसांशी संपर्क साधला.
Akshay Shinde Mother Reaction : अक्षय चुकला असेल, तर त्याला फासावर लटकवा, पण… आईचं मत, पत्नी पाच महिन्यांची गरोदर
दरम्यान, बदलापूर येथील दोन चिमुकल्यांपैकी एका पीडितेच्या व तिच्या कुटुंबीयांच्या प्रकृतीविषयी बुधवारी रात्री ‘सोशल मीडिया’वर चुकीची माहिती व गैरसमज पसरवणारे मेसेज करण्यात आला होता. यामुळे गुरुवारी दिवसभर या अफवेमुळे समाजामध्ये तणाव, असंतोष पसरला होता. अखेर पोलिसांनी या अफवेबाबत खुलासा करून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि हा संदेश न पसरवण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर हा मेसेज पसरवणाऱ्या तरुणीचा सायबर सेल पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने शोध घेतला.

या प्रकरणी बदलापूर येथील चामटोली येथे राहणारी ऋतिका प्रकाश शेलार (२१) या तरुणीला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले असून, समाजात अफवा पसरून तणाव, अशांतता पसरवल्या प्रकरणी तिच्यावर बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.
Raj Thackeray on Badlapur : हा माणूस आज हवा होता! रांझ्याच्या पाटलाचा हात पाय कापून चौरंग केला, तसा… राज ठाकरेंची गर्जना
बदलापूर येथील घटनेचे पडसाद देशभरात उमटत असताना शुक्रवारी दुपारी राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाच्या सदस्य सचिव रूपाली बॅनर्जी यांनी बदलापूर शहरात भेट दिली. यानंतर पालिका प्रशासकीय इमारतीत पोलिस, महसूल, वैद्यकीय अधिकारी, शिक्षण मंडळ, निलंबित मुख्याध्यापिका, पालकांची चर्चा आणि वैयक्तिकरीत्या आयोगाच्या सदस्यांनी चौकशी केली; तर शनिवारीही आयोगाकडून आणखी काही संबंधितांची चौकशी करत याबाबत सविस्तर चोकशीचा अहवाल केंद्र सरकारला पाठवला जाणार आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.