Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

जिल्ह्यात पावसामुळे तिघांचा मृत्यू, ४२ घरांची पडझड; अनेक गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत

6

नंदुरबार(महेश पाटील ): जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्यात तीन जण वाहून गेल्याची घटना घडली आहे. या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून. जिल्ह्यातील 42 घरांची पडझड झाली आहे. अनेक धरणे भरले असून आहेत. पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसात तब्बल तीन जण पुराच्या पाण्यात वाहून गेले. यात अक्कलकुवा तालुक्यात दोन तर अक्राणी तालुक्यात एक जण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना समोर आली आहे.

अक्राणी तालुक्यातील माळचा गेंदा येथील बायसिंग बहादुर पावरा (वय 36) पुरात वाहुन मयत झाले आहेत.तर अक्कलकुवा तालुक्यातील गुलींअंबरचे रहिवाशी असलेले संतोष रमेश वसावे पुराच्या पाण्यात वाहून गेले.अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागातील बर्डी येथील शासकीय आश्रम शाळेत रोजंदारी शिक्षक असलेले ईश्वर रामा वसावे (रा. गमन) हे रोयाबारीपाडा येथील दुकानावरून आपल्या घरी परत जाताना रस्त्यातील नदी ओलांडत असताना काल 25 ऑगस्ट रोजी साडेपाच वाजेच्या सुमारास वाहून गेले होते. त्यांच्या मृतदेह आज 26 रोजी दहा वाजेच्या दरम्यान आढळून आला. तीन दिवसात मोठा पाऊस झाल्याने जिल्ह्यातील 42 घरांची पडझड झाली आहे.
MP Kangana Ranaut: बेताल वक्तव्य टाळा, प्रत्येक मुद्द्यावर बोलण्याची गरज नाही; भाजपकडून कंगना रणौतची कानउघडणी

मातीचा तलाव फुटला

धडगाव तालुक्यातील तीनसमाळ येथे मातीचा तलाव फुटल्याने तेथील अनेक घरांचे नुकसान झाले.मातीचा मलबा व पाणी घरात शिरल्याने सामानासह शेतातील पिके ही वाहून गेले.आज 26 ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजे दरम्यान दरम्यान घटना घडली.

अक्कलकुवा व‌ धडगाव तालुक्यात जनजीवन विस्कळीत

सातपुड्याच्या कुशीतील अक्कलकुवा व धडगाव तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरु असुन २३ जुलै रोजी सकाळ पासूनच सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे सातपुड्यातील अनेक गावांचा सुमारे दोन ते तीन तास संपर्क तुटला होता. सातपुड्यातील मोलगी अक्कलकुवा रस्त्यावर घाट सेक्शन मध्ये ठिकठिकाणी दरडी कोसळून वाहतूकीला अडथळा निर्माण झाला आहे. तसेच तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने तालुक्यातील नदी-नाल्यांना मोठा पूर आ़ला आहे. विशेष म्हणजे असली गावाजवळ असलेल्या उदय नदीला पूर आल्याने पूराचे पाणी जोरदार प्रवाहाने पुलावरुन वाहत असून याठिकाणी पाण्याचा अंदाज येत नसल्याने येणाऱ्या जाणाऱ्या दुचाकी तसेच चारचाकी वाहनचालकांना धोका आहे. सातपुड्यातून उगम पावणा-या सर्वच नदी-नाल्यांना पूर आला आहे. सातपुड्याच्या कुशीत जोरदार पाऊस झाल्याने अक्कलकुवा येथील वरखेडी नदीला देखील पूर आला आहे.

अनेक पुल, फरशी पाण्याखाली

तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धरणे भरले आहेत. तसेच अनेक नद्यांना पूर आला नाही तसेच फरशी पाण्याखाली आली आहे.त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.