Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Sindhudurg News: नव्याने पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभे करत असताना या किल्ल्याच्या आजूबाजूला लागून असलेली खासगी काही नागरिकांची जमीन आहे ती सुद्धा योग्य दराने स्मारकासाठी घेतली जाणार आहे.
हायलाइट्स:
- राजकोट किल्ल्याच्या बाजूची जागा राज्य सरकार विकत घेणार
- स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन ही जागा विकत घेतली जाणार
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला साजेसं असं पुन्हा नव्याने स्मारक उभे करणार
काँग्रेसला ‘अपेक्षित’ धक्का, क्रॉस व्होटिंग संशयित आमदाराचा राजीनामा, भाजपच्या वाटेवर
”समुद्राच्या काठी वेगवेगळ्या महापुरुषांचे पुतळे दिमाखात उभे आहेत. हे पुतळे उभे करत असताना समुद्रकिनारी वाऱ्याचा वेग किती असेल? त्याची उंची किती असली पाहिजे? टेक्चर कसं असलं पाहिजे? याचा संपूर्ण अभ्यास केला जातो. पाठीमागच्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रामध्ये उभा करण्याचं चर्चा चाललेली होती. वेगवेगळ्या सरकारने निर्णय घेतले पण मात्र पुढचा निर्णय कोर्टामध्ये गेल्यामुळे ते तिथे अडकून पडलेला आहे. मात्र राजकोट शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात ज्या चुका झाल्या त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात जे दोषी ठरले त्या दोघांवर गुन्हा दाखल झाला असून अटक करण्याची कारवाई सुरू आहे.