Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Police Personnel Washing MLA Car: एका पोलिसाने आमदाराची गाडी धुतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याबाबत आता वेगळीच माहिती समोर आली आहे. नेमकं काय घडल? आणि गाडी का धुतली हे पोलिसानेच सांगितलं आहे.
कॉंग्रेसचे नेते तथा माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?’ या टॅगलाइनखाली आपल्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ अपलोड केला. या व्हिडीओने वादंग उभे केले.
सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय हे ब्रीद अंगीकारणारी पोलिस यंत्रणा जतनेच्या सुरक्षेसाठी आहे की आमदाराच्या गाड्या धुण्यासाठी? असा खोचक सवाल करणाऱ्या ओळी हर्षवर्धन सपकाळ यांनी त्या व्हिडीओखाली लिहिल्या. पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही घटना असल्याचे त्यांनी नमूद केले. याच व्हिडीओला उद्देशून विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची काय दुर्दशा करून ठेवली, अशी टीका केली. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ अपलोड केला. गृहमंत्री एवढे निष्क्रिय आहेत की पोलिसांवर सत्ताधारी आमदाराची गाडी धुण्याची वेळ आली, असा सवालही दानवेंनी केला.
गायकवाड म्हणतात, कर्मचाऱ्याचा मानवतावादी दृष्टीकोन
विरोधकांनी टीका करण्याआधी वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे, असा सल्ला देत या व्हिडीओबद्दल बोलताना आमदार संजय गायकवाड म्हणाले, आज सकाळी ड्युटीवर आलेल्या सुरक्षा रक्षकांनी धाड नाक्यावर नाश्ता केला होता. त्यांना अस्वस्थ वाटले आणि त्यांनी गाडीतच उलट्या केल्या. बाहेरूनही वाहनावर घाण पडली. गाडीमध्ये उलटी केल्याने चालक व त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे सुरक्षा रक्षकाने स्वत:च पाण्याने गाडी धुवून काढली. एक पोलीस कर्मचारी म्हणून गाडी धुतली नाही. भरलेली गाडी स्वच्छ करून कर्मचाऱ्याने उलट मानवतावादी दृष्टीकोन दाखविल्याचेही गायकवाड म्हणाले.
काय म्हणाला कर्मचारी …
संबंधित सुरक्षा रक्षकाशी संपर्क केला असता तो म्हणाला, २८ ऑगस्ट रोजी शेगाव कोर्टात माझी तारीख होती. आज सकाळी ड्युटीवर मला अस्वस्थ होऊन उलटी झाली. साइडला घाण उडाली. वाहन भरल्याचे चांगले न वाटल्याने आपण स्वत:हून वाहन स्वच्छ केले.