Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नव्या लोकलमार्गिकांना वेग, महामुंबईत १६ हजार कोटींची कामे, रेल्वेमंत्री वैष्णव यांची माहिती

11

Mumbai Local: पश्चिम रेल्वेवरून कोकणासाठी थेट रेल्वेगाडी अर्थात वांद्रे ते मडगाव दरम्यान नवी द्वि-साप्ताहिक एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. गाडीची उद्घाटनाची फेरी बोरिवलीवरून गुरुवारी रवाना करण्यात आली.

हायलाइट्स:

  • नव्या लोकलमार्गिकांना प्राधान्य
  • महामुंबईत १६ हजार कोटींच्या कामाला वेग
  • रेल्वेमंत्री वैष्णव यांची माहिती
महाराष्ट्र टाइम्स
मुंबई लोकल रेल्वे बातम्या
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि उपनगरातील प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या लोकलचा प्रवास सुसह्य करण्यासाठी नव्या मार्गिका उभारण्याच्या कामाला गती देण्यात येत आहे. महामुंबईतील १२ प्रकल्पांच्या माध्यमातून १६ हजार कोटींच्या ३०३ किमीच्या नव्या मार्गिका उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.पश्चिम रेल्वेवरून कोकणासाठी थेट रेल्वेगाडी अर्थात वांद्रे ते मडगाव दरम्यान नवी द्वि-साप्ताहिक एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. गाडीची उद्घाटनाची फेरी बोरिवलीवरून गुरुवारी रवाना करण्यात आली. यावेळी माजी रेल्वेमंत्री आणि मुंबईचे खासदार पीयूष गोयल उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अपघातामागे वैभव नाईक तर नाही ना? निलेश राणेंचा ठाकरे गटावर गंभीर आरोप

देशाच्या आर्थिक राजधानीत जीवनवाहिनी म्हणून धावत असलेल्या मुंबई लोकलच्या विस्तारावर रेल्वेमंत्री वैष्णव यांनी भाष्य केले. महामुंबईचा वाढता पसारा लक्षात घेऊन नव्या मार्गिका उभारण्याचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात येणार असून यासाठी १६ हजार २४० कोटींच्या गुंतवणूक करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एकूण तीन हजार २०० फेऱ्यामधून रोज सुमारे ७५ लाख प्रवाशांची वाहतूक करण्यात येते. आगामी गणेशोत्सवासाठी कोकणवासींचा प्रवास सुखकर होण्यासाठी दोन्ही मार्गांवरून ३४२ विशेष रेल्वेगाड्यांची तरतूद करण्यात आली आहे. या गाड्या चालवण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून पायाभूत सुविधांच्या देखभालीची योग्य तजवीज करण्यात आली आहे, असेही रेल्वे मंत्र्यांनी स्पष्ट केले.

० महामुंबई परिसरात १२ प्रकल्प

० एकूण ३०३ किमीच्या नवीन मार्गिकांची कामे

० पश्चिम रेल्वेवरून वांद्रे-मडगाव एक्स्प्रेसला हिरवा झेंडा
Devendra Fadnavis: लोकसभेतील ओव्हर कॉन्फिडन्स नडला, अजित पवार आल्याने… फडणवीसांचं धक्कादायक वक्तव्य

महामुंबईतील नव्या रेल्वे मार्गिका

सीएसएमटी ते कुर्ला पाचवी आणि सहावी मार्गिका ८९१ कोटी रु.

मुंबई सेंट्रल ते बोरिवली सहावी मार्गिका (३० किमी) ९१९ कोटी रु.

हार्बर मार्ग गोरेगाव ते बोरिवलीपर्यँत विस्तार (७ किमी) ८२६ कोटी रु.

बोरिवली ते विरार पाचवी आणि सहावी मार्गिका (२६ किमी) २,१८४ कोटी रु.

विरार ते डहाणू तिसरी आणि चौथी मार्गिका (६४ किमी) ३,५८७ कोटी रु.

पनवेल-कर्जत नवा उपनगरी मार्ग (२९.६ किमी) २,७८२ कोटी रु.

ऐरोली ते कळवा उन्नत उपनगरी मार्ग (३.३ किमी) ४७६ कोटी रु.

कल्याण ते आसनगाव चौथी मार्गिका (३२ किमी) १७५९ कोटी रु.

कल्याण ते बदलापूर तिसरी आणि चौथी मार्गिका (१४ किमी) १,५१० कोटी रु.

कल्याण ते कसारा तिसरी मार्गिका (६७ किमी) ७९२ कोटी रु.

नायगाव – जूचंद्र डबल कॉर्ड मार्गिका (६किमी) १७६ कोटी रु.

निळजे – कोपर डबल कॉर्ड मार्गिका (५ किमी) ३३८ कोटी रु.

महामुंबई

नव्या मार्गिका ३०१.५ किमी

एकूण खर्च १६,२४० कोटी

महाराष्ट्र

एकूण रेल्वे प्रकल्प ४१ (५,८७७ किमी रेल्वे मार्गिका)

एकूण खर्च ८१,५८० कोटी

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.