Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Maharashtra Live News Today: वाचा रविवार १ सप्टेंबर २०२४ च्या सर्व ब्रेकिंग न्यूज आणि महत्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

7

Ahmednagar News: नगर-मनमाड महामर्गाच्या दुरुस्तीचे काम जोमात, अवजड वाहतूक बंदी

मागील अनेक वर्षांपासून दुरावस्था झालेल्या नगर-मनमाड महामर्गाच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे. या दुरुस्तीच्या कामासाठी विळद बाह्यवळण ते पुणतांबा फाटा या रस्त्यावरील अवजड वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे. ही अवजड वाहनांची वाहतूक आजपासून ते सप्टेंबरपर्यंत इतर मार्गावरून वळवण्यात येणार आहे. नगर-मनमाड महामार्गावर अवजड वाहतूक सुरू असल्यामुळे दुरुस्तीच्या कामामध्ये व्यत्यय येत आहे. यामुळे वाहतूककोंडी होऊन दुरुस्तीच्या कामास विलंब होत आहे. सध्या पावसाळा सुरू असून दुरुस्ती केलेल्या रस्त्यावरून अवजड वाहने लगेच जात असल्यामुळे पुन्हा रस्ता खराब होत आहे. तसेच या मार्गावर शिर्डी साईबाबा मंदिर असल्याने भाविकांची वर्दळ असते. दुरुस्तीच्या कामादरम्यान अवजड वाहनांमुळे अपघात होऊ नये, यासाठी अवजड वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.