Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Maharashtra Assembly Election 2024: लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं महायुतीचा धर्म पाळला नाही. मग आता विधानसभेला आम्हीही युतीधर्म पाळणार नाही, असं विधान लातूर ग्रामीणचे भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुखांनी केलं आहे.
महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा झालेला समावेश, अजित पवारांना देण्यात आलेलं अर्थ मंत्रीपद, त्यांच्याकडून करण्यात येणारं निधी वाटप या सगळ्याबद्दल भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी खदखद बोलून दाखवली. ‘बाबासाहेब पाटील तालुक्याचे आमदार आहेत. त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्याला कधीच जवळ केलं नाही हा इतिहास आहे. आता ते आमच्या महायुतीत सामील झाले. आमच्याकडे असलेलं खातंही काढून घेतलं. अजित पवारांकडे अर्थ खातं आहे. आता त्यांच्याकडे कितीही मागा. अजित पवारांनी राष्ट्रवादीचे जिथे जिथे आमदार आहेत, तिथे किती पैसे दिले. बाबासाहेब पाटील यांच्या अहमदपूरला अडीच हजार कोटी रुपये दिले. किती? २००-२५० कोटी नाही. तर तब्बल २५०० कोटी रुपये दिले,’ अशी आकडेवारी देशमुखांनी मांडली.
Maharashtra Assembly Election: महायुतीचा फॉर्म्युला ठरला! १० दिवसांत घोषणा; भाजप , शिंदेसेना, अजितदादांना किती किती जागा?
‘बाबासाहेब पाटील यांनी कधीच भाजप कार्यकर्त्यांचा विचार केला नाही. निधी आमचा आहे. सरकार आमचं आहे. तिन्ही पक्षांना समान वाटा करुन निधी देणं त्यांचं काम आहे. पण त्यांनी तसं केलं नाही. भाजप म्हटलं की त्यांचं डोकं उठतंय. लोकसभेला आमच्या खासदाराचा प्रचार त्यांनी केला नाही. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचं एकही मत भाजप उमेदवाराला पडलं नाही. महायुतीचा धर्म त्यांनी पाळला का? नाही ना? मग आम्ही का पाळायचा?,’ असा सवाल देशमुख यांनी विचारला.
विधानसभा निवडणुकीत आम्ही महायुतीचा धर्म पाळणार नाही, अशी जाहीर भूमिका देशमुखांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना घेतली. भाजपच्या एकाही कार्यकर्त्याचं मत बाबासाहेब पाटील यांना मिळणार नाही, हे तुम्हाला पक्कं माहीत असावं. माणसानं इतकं स्पष्ट बोलावं. ताकाला जाऊन कशाला भांडं लपवायचं?, अशा शब्दांत देशमुखांनी त्यांची भूमिका कार्यकर्त्यांसमोर मांडली.