Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Ganeshotsav 2024: ऐन सणासुदीत ‘एफडीए’ची मोहीम बंदच; अन्नपदार्थ तपासणी, भेसळीवर प्रश्नचिन्ह

9

Ganeshotsav 2024: यंदा ‘एफडीए’कडून गुणवत्ता चाचणी मोहिमेची अद्याप सुरुवातच झालेली नाही. त्यामुळे भेसळयुक्त पदार्थ बनवणाऱ्यांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र टाइम्स
sweets shop2
मुंबई : गणेशोत्सवामध्ये मावा, मिठाई आणि प्रसादाच्या पदार्थांमधून विषबाधा होऊ नये, या पदार्थांची गुणवत्ता चांगली राहावी, यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) माध्यमातून दरवर्षी विशेष मोहीम राबवली जाते. यंदा मात्र गणेशोत्सव पाच दिवसांवर आला असताना ‘एफडीए’ने अशी कोणतीही मोहीम सुरू केलेली नाही. प्रसाद, मावा, मिठाईची गुणवत्ताचाचणी कोण करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

उत्सवाच्या काळामध्ये गोड पदार्थ, मिठाया, प्रसादाचे पदार्थ, पेढे, मावा, दुग्धजन्य पदार्थ यांची उलाढाल कोट्यवधींची असते. त्यामुळे या पदार्थांची गुणवत्ता, दर्जा तपासणे अतिशय महत्त्वाचे असते. यापूर्वी गणेशोत्सवाच्या किमान पंधरा ते वीस दिवस आधी ही मोहीम सुरू होऊन ती नाताळपर्यंत चालत असे. यंदा ‘एफडीए’कडून गुणवत्ता चाचणी मोहिमेची अद्याप सुरुवातच झालेली नाही. त्यामुळे भेसळयुक्त पदार्थ बनवणाऱ्यांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ‘एफडीए’ने दुग्धजन्य पदार्थ कधी तयार केला आहे, त्यात कोणते घटक वापरले आहेत, हे पदार्थ कसे साठवले जातात, त्याची मुदत कधी संपते, याची माहिती विक्रेत्यांना देणे बंधनकारक केले आहे. ‘एफडीए’ राबवत असलेल्या मोहिमेच्या वेळी या बाबींची काटेकोर पूर्तता केली जाते का, याची पडताळणी केली जाते. अन्यथा, संबधित दुकानदारावर कारवाई केली जाते. यंदा हे निकष पाळले जाणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाकडे विचारणा केली असता, लवकरच तपासणी मोहीम सुरू करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

तपासणी कोणाकडून?
अन्न विभागामध्ये काही दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. मुंबई आणि ठाणे याच ठिकाणी या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. रोटेशन पद्धतीने बदल्या व्हाव्यात, यासाठी ‘एफडीए’ने समिती नेमली होती. मात्र, त्या समितीने दिलेल्या निकषांचे पालन करण्यात आलेले नाही. त्यामुळे मुंबई, ठाणे वगळता राज्याबाहेरील भागांमध्ये या गुणवत्ता चाचण्या कोणाकडून करण्यात येणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही प्रसाद आणि मिठाई तयार करताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला हवी, कोणते निकष पाळावे, याचे मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. मात्र, मंडळांना अशा कोणत्याही प्रकारच्या सूचना अद्याप आलेल्या नाहीत.

Ganeshotsav 2024: ऐन सणासुदीत ‘एफडीए’ची मोहीम बंदच; अन्नपदार्थ तपासणी, भेसळीवर प्रश्नचिन्ह

व्यावसायिकांनी काय करावे?
-मिठाई किती दिवसांपर्यंत खाण्यायोग्य असेल, याची तारीख ट्रेवर दर्शनी भागामध्ये लावावी.
-खवा, मावा यासारख्या अन्नपदार्थ नोंदणी किंवा परवानाधारक व्यावसायिकांकडून खरेदी करावेत.
-पदार्थ तयार करताना पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा.
-पदार्थांची स्वच्छ व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
-जाळीदार झाकणांचा वापर करावा.
Ganeshotav 2024: उत्सवाला महागाईचे चटके! मोदक, लाडू, मिठाईसह सुक्या मेव्यांच्या दरांत ३० टक्के वाढ, असे आहेत दर
ग्राहकांनी काय करावे?
-मिठाई, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची खरेदी नोंदणी किंवा परवानाधारक विक्रेत्यांकडून करावी.
-उघड्यावरील किंवा फेरीवाल्यांकडून खवा, मिठाई खरेदी करणे टाळावे.
-मिठाई कधी तयार केली आहे, ती कधीपर्यंत वापरता येईल, यासंदर्भातील प्रश्न विक्रेत्यांना विचारावेत.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.