Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Ganeshotsav 2024: फेटा, पगडी वाढविणार बाप्पाचा थाट; पैठणी फेट्यासह दागिन्यांनी मढलेल्या पुणेरी पगडीलाही पसंती
Ganeshotsav 2024: गणेशोत्सवाला शनिवारपासून सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवडाभरापासून बाजारपेठेत चैतन्य अवतरले आहे. मागील तीन-चार दिवसांपासून बाजारपेठेत ग्राहकांची प्रचंड गर्दी होऊ लागली आहे
गणेशोत्सवाला शनिवारपासून सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवडाभरापासून बाजारपेठेत चैतन्य अवतरले आहे. मागील तीन-चार दिवसांपासून बाजारपेठेत ग्राहकांची प्रचंड गर्दी होऊ लागली आहे. विशेष म्हणजे सायंकाळी पाचनंतर बाजारपेठा ग्राहकांनी उजळून निघाल्या आहेत. गणरायाची आरास सर्वोत्तम आणि आकर्षक व्हावी यासाठी लायटिंग माळा, एलईडी लाइट्स, मखर आणि इतर सजावट साहित्याची खरेदी केली जात आहे. याचबरोबर गणपती बाप्पाचे रूप खुलवण्यासाठी रुद्राक्ष, सोनेरी मण्यांचे हार, लाल- पिवळ्या गोंड्याचे हार, मोत्यांचे हार आणि सॅटन रेबिनपासून बनलेले हार तसेच विविध खड्यांच्या सोंडपट्ट्या, हातातील तोडे, कानांच्या पाळ्यांमध्ये घालायचे दागिने, जानवे या वस्तू गणेशभक्तांसाठी खास आकर्षण ठरत आहे. विविध रंगांचे आकर्षक फेटे आणि पुणेरी पगडीही लक्ष वेधून घेत आहे. बाजारात फेटे ४० रुपयांपासून उपलब्ध आहेत, तर पगडी दोनशे रुपयांपासून पुढे विक्री होत आहे.
मोत्याच्या हारांनाही पसंती
बाजारात गुलाबी, पिवळा, लाल रंगाच्या मोत्यांचे हार उपलब्ध आहेत. बाजारात या हारांची किंमत शंभर रुपयांपासून पुढे आहे. याचबरोबर विविध प्रकारच्या मण्यांचे हार वेगवेगळ्या डिझाइनमध्ये बाजारात उपलब्ध असून, त्यांची किंमत पन्नास ते पाचशे रुपयांपर्यंत आहे. याचबरोबर विविध डिझाइनमध्ये मोत्यांच्या कंठ्यादेखील उपलब्ध आहेत.
Ganesh Chaturthi 2024: ‘गणेश चतुर्थी’वर निबंध लिहताय? मुद्देसूद आणि वाचनीय लिखाणासाठी आवश्यक माहिती, वाचा सविस्तर
‘स्वदेशी’ झगमगाटाला पसंती
नाशिक : गणेशोत्सव आठवड्याभरावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे बाप्पाच्या स्वागतासाठी नाशिककरांची लगबग सुरू आहे. बाप्पाच्या आकर्षक मूर्तीसह आरासही आकर्षक व्हावी, यासाठी सजावट साहित्यासह रंगीबेरंगी लायटिंग माळांचीही खरेदी होत आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून व्यावसायिकांनी चिनी साहित्यावर बहिष्कार टाकला आहे. तर, ग्राहकांकडूनही स्वदेशीला पसंती मिळत आहे. शनिवारपासून (दि. ७) घरोघरी जल्लोषात बाप्पाचे आगमन होणार आहे. आठवडाभरावर गणेशोत्सव येऊन ठेपल्याने शहरातील मुख्य बाजारपेठांसह उपनगरीय भागांतही गणेशमूर्तींसह सजावट साहित्य विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी वर्दळही वाढली आहे.