Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Kundmal Waterfall Accident: सेल्फीचा मोह नडला, पाय घसरला अन् सर्व काही संपले; कुंडमाळ येथे तरुण, तरुणी गेले वाहून

9

Pune News: पुण्यातील मावळ तालुक्यातील कुंडमाळ येथे मंदिरा शेजारी उभे राहून सेल्फी काढत पाय घसरल्याने १७ वर्षीय तरुणी आणि २२ वर्षीय तरुण दोघे वाहून गेले. या दोघांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
पुणे (मावळ) प्रशांत श्रीमंदिलकर : मावळ तालुक्यातील एक धक्कादाय घटना समोर आली आहे. कुंडमाळ येथे फिरण्यासाठी आलेल्या सहा मुले व दोन मुलींपैकी एक मुलगा आणि एक मुलगी पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मावळ तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित मुले ही पर्यटनासाठी या भागात आल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस प्रशासन व रेस्क्यू टीमकडून या दोन तरुणांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

श्रेया सुरेश गावडे (वय 17), रोहन ज्ञानेशवर ढोंबरे (वय 22) रा. चिंचवड गाव, अशी वाहून गेलेल्या तरुण-तरुणीची नावे आहेत. त्यांचा शोध प्रशासनाकडून सुरू करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पिंपरी चिंचवड परिसरातून आज सकाळी पावणेदहाच्या समोरास मावळ तालुक्यातील कुंदमाळ येथे सहा मुले व दोन मुली फिरण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी श्रेया गावडे व रोहन ठोंबरे हे दोघेजण कुंडमाळच्या शेजारी असलेल्या मंदिरा शेजारी उभे राहून सेल्फी काढत होते. मात्र सेल्फी काढताना त्यांचा पाय घसरला व दोघेही पाण्यामध्ये वाहून गेले. त्यांच्या मित्र-मैत्रिणींना आरडाओरडा केल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर स्थानिक प्रशासन व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
आदित्य ठाकरे, तुम्ही तोंडात चांदीचा चमचा पकडून जन्म घेतला; माझ्यासोबत…; कृषिमंत्री धनंजय मुंडेंचे चॅलेंज

सकाळपासूनच या दोघांना शोधण्याचे काम पिंपरी चिंचवड पोलीस व रेस्क्यू टीमकडून सुरू करण्यात आले आहे. ते वाहून गेल्याची घटना प्रत्यक्ष दर्शनी पोलिसांना दिली आहे. घटनास्थळी वन्यजीव आपदा संस्था मावळ तसेच तळेगाव एमआयडीसी पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून या दोघांना शोधण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे सोबत आलेले मित्र-मैत्रिणी पूर्णतः घाबरलेल्या आहेत. घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.

या अगोदर देखील कुंडमाळ धबधब्यामध्ये अनेक जण वाहून गेले आहेत. त्यात त्यांचा मृत्यू देखील झाला आहे. मात्र आजची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या भागात शोधकार्य झपाट्याने सुरू असून पोलिसांकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

जयकृष्ण नायर

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.