Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

संतापजनक! विवाहित महिलेवर नातेवाईकांकडून लैंगिक अत्याचार, नंतर पतीने केली तरुणीला बेदम मारहाण

12

Kalyan : तीस वर्षीय विवाहित महिलेवर नातेवाईकांकडून लैंगिक अत्याचार करत मारहाण, महिलेची प्रकृती गंभीर सद्यस्थितीत रुग्णालयात उपचार सुरु आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
विवाहित महिलेवर शारीरिक अत्याचार
कल्याण, प्रदीप भणगे : राज्यात महिला अत्याचारांच्या घटना वाढत असतानाच आणखी एक महिला अत्याचाराची घटना समोर आली आहे. टिटवाळामधील कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिला अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. एका तीस वर्षीय विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार करत नंतर महिलेला बेदम मारहाण करण्यात आली आहे. महिलेची अवस्था गंभीर असल्याने तिला उपचारासाठी ठाण्यातील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. लैंगिक अत्याचार करणारे महिलेचे नातेवाईक असल्याची माहिती मिळत आहे. तीन नातेवाईकांनी मिळून महिलेवर लैंगिक अत्याचार केला आणि नंतर महिलेला पतीच्या साह्याने लाठी काठी दगड आणि वीट मारून गंभीर जखमी केले आहे. कल्याण तालुका पोलीस ठाण्यात पती ,सासरा ,दिरा असे तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना सहा तारखेची असल्याची माहिती मिळत आहे. आज कल्याण तालुका पोलिसांनी गुन्हा केला दाखल केला असून यातील दोन आरोपीना पोलिसांनी पकडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

बातमी अपडेट होत आहे…

प्रतीक्षा बनसोडे

लेखकाबद्दलप्रतीक्षा बनसोडेपत्रकारिता क्षेत्रातील पाच वर्षाचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सध्या डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी डीडी नॅशनल, लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये रिपोर्टर म्हणून काम केले आहे. झी २४ तासमध्ये डिजीटल टीममध्ये काम केलं आहे. राजकीय आणि सामजिक बातम्या लिहिण्याची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.