Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 9 Sept 2024, 7:32 pm
Shinde Shivsena : विधानसभा निवडणुकांची तयारी सर्वपक्षीय नेत्यांनी सुरु केली आहे. अशातच मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी आता प्रत्येक पक्ष निरनिराळे उपक्रम राबवत थेट मतदारांच्या घरापर्यंत पोहचत आहेत. अशातच शिंदेंच्या शिवसेनेने सुद्धा एक नवा उपक्रम सुरु केला आहे.
Ladki Bahin Yojna : राष्ट्रवादीने ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या जाहिरातीतून ‘मुख्यमंत्री’च वगळले, शिंदेसेना नाराज
या उपक्रमाअंतर्गंत शिंदेंच्या सेनेचा प्रत्येक कार्यकर्ता आपल्या परिसरातील १५ कुटुंबाची भेट घेणार आहे. शासनाच्या योजनांची माहिती देणार आहे. तसेच बहुचर्चित लाडकी बहीण योजनेबद्दल जनमानसात असलेली भूमिका समजून घेणार आहे. योजनेचा उद्यापासून शुभारंभ होणार आहे. सीएम शिंदे उद्या स्वत: १५ कुटुंबाची भेट घेणार आहे. यामध्ये सरकारच्या युवा आणि महिलांसाठी असणाऱ्या दहा योजनांची माहिती देणे, तसेच ज्या घरात एखाद्या महिलेने लाडक्या बहिणीचा अर्ज भरला नसेल तर त्या महिलेला लाडकी बहिणीचा अर्ज कसा भरायचा याबद्दल मार्गदर्शन करणे इत्यादी गोष्टींचा समावेश असणार आहे.
लाडकी बहीण योजना कोणासाठी लकी? अजित दादांमागोमाग शिंदेही मैदानात, शिवसेनेचा भन्नाट प्लान
आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादी गट सुद्धा कामाला लागला आहे. अजित पवार गटाने जनसंवाद यात्रा सुरु केली आहे. खुद्द अजित पवार प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात भेट देत लाडकी बहीण योजना आपणच आणली असे भाषण करताना दिसले. तसेच लाडकी बहीण योजना अशी थीम ठेवून जनसंवाद यात्रा सुरु करताना अजित पवार दिसले. तर दुसरीकडे भाजपसुद्धा लाडकी बहीण योजना आणि इतर योजना तळगाळात पोहचवत फडणवीसांनी योजना आणल्या आहेत असा प्रचार करताना दिसत आहे. यावरुन ऐन विधानसभेच्या तोंडावर लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेण्यासाठी रस्सीखेच सुरु झाले आहे. इतकेच नव्हे तर अजित पवार गट, भाजप आणि आता चक्क शिंदेंची शिवसेना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा आधार घेत घराघरात जात थेट निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे. लाडकी बहीण योजनेचे नावच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असे आहे. हेच ध्यानात ठेवून आता खुद्द शिंदे प्रचार करताना दिसतील.