Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

History of Lord Tirupati Laddu: तिरुपती लाडूचा इतिहास, रहस्य…माता लक्ष्मीने तयार केला प्रसाद ! जाणून घ्या महत्त्व

15

Tirupati laddoos History: तिरुपती बालाजी मंदिर असे म्हटले की आपल्या डोळ्यासमोर तीन प्रमुख गोष्टी येतात. पहिली भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि श्रीमंत देवस्थानांपैकी एक मंदिर, दुसरी दररोज हजारोंच्या संख्येने भक्तमंडळी श्री व्यंकटेश्वर स्वामी यांचे दर्शन घेतात आणि तिसरी गोष्ट म्हणजे तिरुपती बालाजीचा प्रसाद म्हणून मिळणारा लाडू. अत्यंत शुभ, सात्विक आणि थेट देवाचा आर्शिवाद म्हणून या प्रसादाकडे पाहिले जाते. पण सध्या तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादात भेसळ असल्याचा मुद्दा चांगलाच गाजतोय. या पार्श्वभूमीवर जाणून घेवूया तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाचा इतिहास, महत्त्व आणि हा प्रसाद एवढा प्रसिद्ध का आहे त्यासंदर्भातील कारणे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

Tirupati laddoos Katha:

तिरुपती बालाजीचा प्रसाद खूप प्रसिद्ध आहे. या प्रसादाचा इतिहास समृद्ध आणि प्राचीन असून, तिरुमला वेंकटेश्वर मंदिराचे पारंपरिक रीतिरिवाज आणि भक्ती, पूजाविधी यांच्याशी संबंधीत आहे. या प्रसादाबद्दल भाविकांची अतूट श्रद्धा आणि विश्वास आहे. असं काय आहे या लाडवाच्या प्रसादात हे लाडू कुठून आले? आणि यांची सुरुवात कशी झाली? चला तर जाणून घेवूया.

तिरुपती लाडूचा इतिहास

असे मानले जाते की तिरुपती लाडू प्रसादाची सुरुवात १८ व्या शतकापासून झाली. दरम्यान लाडू हा खास प्रसाद म्हणून कधी स्विकारला गेला याबदद्ल माहिती सापडत नाही. शेकडो वर्षांपासून लाडू प्रसादाबद्दल लोकांच्या मनात अपार श्रद्धा आणि भक्ती आहे. असे ही सांगितले जाते की या प्रसादाची प्रक्रिया आणि सामग्री शतकानुशतके बदलली नाही, ज्यामुळे त्याचा अप्रतीम स्वाद आणि ओळख कायम राहिलेली आहे.म्हणून तर तिरुपतीच्या लाडू प्रसादाला खास महत्त्व आहे. तिरूपती लाडू प्रसाद एका खास स्वयंपाकघरात तयार केला जातो, ज्याला “पोटू” असे म्हणतात, जिथे पारंपरिक समुदायातील पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या कुशल आचाऱ्यांकडून हा प्रसाद तयार केला जातो. प्रसादाच्या रूपात लाखो लाडू येथे तयार होतात. जसे लाडू तयार होतात त्यातील पहिला लाडू भगवान वेंकटेश्वराला अर्पण केला जातो, त्यानंतर तो भाविकांमध्ये वितरित केला जातो. प्रत्येक भाविकाला एक लाडू मोफत मिळतो

तिरुपती लाडूला GI टॅग

तिरुपतीच्या लाडवाला 2009 मध्ये भौगोलिक मानांकन – GI टॅग देखील मिळाला होता. यामुळे तिरुपती लाडवाला एक विशिष्ट ओळख प्राप्त झाली. तसेच प्रसादाची वैशिष्टय आणि गुणवत्ता सुरक्षित राहीली. तिरूपती लाडू प्रसादाबद्दल लोकांमध्ये अशी मान्यता आहे की हा प्रसाद म्हणजे थेट तिरूपती बालाजी यांचा आशिर्वाद असून तो ग्रहण केला असता आपल्या सर्वमनोकामना भगवंत पूर्ण करतो.

तिरूपती लाडू पौरााणिक कथा

तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाचे धार्मिक महत्त्व जाणून घेताना, यासंदर्भातील एक पौराणिक कथा सांगितली जाते. प्रसादामध्ये लाडूचा समावेश करण्याचा संबंध द्वापर युगातील भगवान कृष्णाच्या बाललीलेशी लावला जातो. एकदा काय झाले नंदबाबा आणि यशोदा मातेने भगवान विष्णु यांची पूजा केली आणि त्यांना नैवेद्य म्हणून लाडू अर्पण केले. तिथे जवळच बाळकृष्ण खेळत होते. नैवेद्य अर्पण केल्यानंतर नंदबाबा आणि यशोदा माता यांनी भगवान श्री विष्णु यांना नैवेद्य ग्रहण करण्यासाठी बोलावले. ते दोघे डोळे बंद करून भगवंताची प्रार्थना करत होते. जेव्हा त्यांनी डोळे उघडले तर काय पाहतात, बाळकृष्ण लाडवाचे ताट घेवून मनसोक्तपणे लाडू खात होते. ते दोघे हसले कारण बालकृष्णाच्या लीला त्यांना माहित होत्या. माता यशोदाने पुन्हा लाडू तयार केले आणि नैवेद्य दाखला आणि पुन्हा तेच घडले. बाळकृष्ण चक्क त्यांच्यासमोर लाडू खात होते. आता मात्र नंदबाबांना राग आला आणि त्यानी कान्हाला सांगितले, ‘अरे कान्हा थोडा थांब आधी भगवंताला नैवेद्य ग्रहण करु दे मग तू प्रसाद खा.’ त्यावर कान्हा म्हणाला, ‘बाबा, तुम्हीच मला नैवेद्या खायला या म्हणून सांगत आहात’ असे बोलून बाळकृष्णाने त्यांना भगवान विष्णुच्या रूपात दर्शन दिले आणि म्हणाले, ‘तुम्ही माझ्यासाठी खूप स्वादिष्ट लाडू बनवलेत, आता हाच माझा आवडीचा नैवेद्य आहे.’ तेव्हापासून बाळकृष्णाला लोणी-साखर तर चतुर्भुज श्रीकृष्ण अर्थात भगवान श्री विष्णु यांना लाडवाचा नैवेद्य दाखवला जातो.

तिरूपती लाडू पौरााणिक कथा

या संदर्भात एक लोककथा अशी ही सांगतात ज्याचा संदर्भ भगवान बालाजी आणि देवी लक्ष्मी यांच्यात झालेल्या भांडणाशी लावला जातो. एकदा भगवान वेंकटेश्वर आणि देवी लक्ष्मी यांच्यात हा वाद झाला, कोणाला सर्वात जास्त नैवेद्य अर्पण केला जातो. भगवान वेंकटेश्वर यांचे म्हणणे होते त्यांनाच सर्वाधिक नैवेद्य मिळतो. तर माता लक्ष्मीचे म्हणणे होते त्या नैवेद्यात त्यांचा ही वाटा आहे. कारण माता लक्ष्मी संपत्तीची देवी असून त्यांच्याशिवाय काहीही शक्य नाही. या वादाचा निर्णय करण्यासाठी त्यांनी एका भक्ताची परीक्षा घेतली. प्रथम ते त्यांच्या एका श्रीमंत भक्ताच्या घरी गेले. त्याने विविध पक्वान्न तयार केली आणि भगवंताला नैवेद्य दाखवला, परंतु लक्ष्मीमाता तृप्त झाल्या नाहीत. त्यानंतर ते आणखी एका भक्ताच्या घरी गेले. तो भक्त गरीब होता त्यावेळी त्याच्याकडे उरलेलं पीठ, काही फळे-सुका मेवा होता त्याला एकत्रित करून त्याने लाडू तयार केला आणि दोघांना अर्पण केला. भगवान बालाजी त्या नैवेद्याने तृप्त झाले आणि त्यानंतर लाडू हा भगवान श्रीविष्णू यांचा आवडता प्रसाद झाला.

माता लक्ष्मीने तयार केले प्रसादाचे लाडू

आणखी एका कथेनुसार असे सांगितले जाते की तिरुमला टेकडीवर जेव्हा भगवान वेंकटेश्वरांची मूर्ती स्थापन होत होती, त्यावेळी मंदिराचे पूजारी प्रसाद काय करावा याबद्दल विचार करत होते. तेव्हा एक वृद्ध महिला हातात लाडवाचे ताट घेवून तिथे आली. हा नैवेद्य बालाजी यांना अर्पण करा अशी विनंती तिने केली. पुजाऱ्यांनी लाडवांचा नैवेद्य अर्पण करून त्यानंतर प्रसाद म्हणून तो ग्रहण केला. त्याचा स्वाद अप्रतीम होता, त्या वृद्ध महिलेने तो लाडू कसा तयार केला याबद्दल तिला ते विचारण्यासाठी निघाले पण ती महिला गायब झाली होती. तेव्हा असे मानले गेले की देवी लक्ष्मी स्वतः प्रसाद काय दाखवावा हे सांगण्यासाठी स्वयंम तिथे आली होती. तेव्हापासून लाडू भगवान वेंकटेश्वरांचा विशेष प्रसाद मानला जावू लागला आणि भक्तांमध्ये त्याचे वितरण करण्यास सुरुवात झाली ती प्रथा आजपर्यंत सुरु आहे.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.