Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

राज ठाकरेंचा गड, उमेदवार नसल्याने अडचण; नाशकात मनसेकडून अद्याप एकही नाव नाही

8

MNS No Candidate From Nashik: राज्यात निवडणुका जाहीर झाल्यानंतर उमेदवारांची नावं जाहीर होत आहेत. मनसेनेही त्यांच्या उमेदवारांची नावं जाहीर केली. पण, मनसेने अद्याप नाशकात आपला एकही उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे बालेकिल्ल्यात मनसेने उमेदवार दिला नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

हायलाइट्स:

  • मनसेकडून ४५ उमेदवारांची यादी जाहीर
  • नाशकात मनसेचा एकही उमेदवार नाही
  • बालेकिल्ल्यात कधी उमेदवार जाहीर करणार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकी जाहीर झाल्यापासून सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यास सुरुवात केली. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये ४५ उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहे. पण, या यादीत मनसेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्याला या यादीत स्थान देण्यात आलेलं नाही. नाशकात १५ विधानसभा मतदारसंघ आहेत. पण, या मतदारसंघांपैकी एकाही मतदारसंघात मनसेने आपला उमेदवार दिलेला नाही. नाशिक हा एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला होता. कारण, मुंबईनंतर एका नाशकातच मनसेची ताकद होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत मनसेने नाशकात अद्याप तरी एकही उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे नाशकात मनसेची पावर कमी होत आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
NCP Candidate First List: NCPच्या यादीतून टिंगरेंचं नाव गायब; पोर्शे प्रकरण भोवलं की BJP ने डाव साधला, पेच वाढला
मनसेने आपल्या ४५ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. मात्र, यामध्ये नाशकातील १५ मतदारसंघांपैकी एकाही मतदारसंघात उमेदवार जाहीर झालेला नाही. याउलट, मनसेने मुंबई व्यतिरिक्त नागपूर, सोलापूर, गेवराई, औसा, आष्टी, जळगाव शहर, तासगाव या मतदारसंघात उमेदवार दिलेत. पण, नाशकात उमेदवार का दिला नाही हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे.

मनसेची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदा २००९ च्या निवडणुकीत नाशकात तीन आमदार जिंकून आले. त्यानंतर नाशिक महानगरपालिकेत मनसेने ४० नगरसेवकांसह सत्ता स्थापन केली. मात्र, यंदाच्या निवडणुकीत मनसेने नाशकात अद्याप उमेदवार दिला नसल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. नाशकात मनसेकडे बोटावर मोजण्याइतके चेहरे आहेत. त्यामुळे तुल्यबळ उमेदवार नसल्याने मनसेने अद्याप उमेदवार दिले नसल्याचं बोललं जात आहे.

गटबाजीचा मनसेला मोठा धक्का बसला आणि नाशकात त्यांची सत्ता गेली. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा नाशकात आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याची तयारी केली आहे. यादरम्यान, राज ठाकरेंनी नाशकातील इच्छुकांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी उमेदवार कधी जाहीर करणार हा प्रश्न आहे. येत्या २९ ऑक्टोबरपर्यंतच उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. त्यामुळे राज ठाकरेंना याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागणार आहे.

MNS Candidate List: राज ठाकरेंचा गड, उमेदवार नसल्याने अडचण; नाशकात मनसेकडून अद्याप एकही नाव नाही

सूत्रांच्या माहितीनुसार मनसे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नाशकातील उमेदवारांच्या घोषणेनंतर आपल्या उमेदवारांची नावं जाहीर करतील. तसेच, नाशिक पूर्व, मध्य, पश्चिम आणि देवळाली या जागांवर मनसे निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे.

नुपूर उप्पल

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.