Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

महाविकास आघाडी आमच्यातलाच उमेदवार फोडण्याचा प्रयत्न करतेय; आमदार सुनील शेळके यांचा मविआच्या नेत्यांना टोला

3

Maharashtra Election 2024: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी आज महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोला लगावला. महाविकास आघाडी आमच्याच पक्षातील माणूस फोडण्याचे काम करत असल्याचे शेळके म्हणाले.

Lipi

पुणे (मावळ, प्रशांत श्रीमंदिलकर): महाविकास आघाडीची यादी अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे आमच्यातलाच एक उमेदवार फोडून आमच्याच विरोधात देण्याचा प्रयत्न भाविका सकाळी कडून केला जात आहे. मात्र आमच्यातले जे इच्छुक आहेत. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. पण आमच्याच विरोधात आमच्याच पक्षातला माणूस फोडण्याचे काम महाविकास आघाडी करत आहे, असा टोला मावळचे आमदार सुनील शेळके यांनी लगावला आहे.

मावळ तालुक्यातील वडगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुनील शेळके हे ग्रामदैवत पोटोबा महाराज यांच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच महाविकास आघाडीला टोला देखील लगावला आहे.
फडणवीसांनी कौशल्याने मिटविला काळे-कोल्हे संघर्ष; आता महाविकास आघाडीची मोठी अडचण, दुसरा उमेदवार शोधण्याची वेळ
यावेळी सुनील शेळके यांनी बोलताना सांगितले की, आज मला पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. ती माझ्या कामाच्या जोरावर सर्वसामान्य नागरिकांच्या पाठिंब्याने देण्यात आली आहे. मागच्या पाच वर्षात जी कामे झाली. तालुक्याला एका उंचीवर नेण्याचा मी प्रयत्न केला. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्यांची कामे करण्यासाठी आणि तालुक्याला एका उंचीवर नेण्यासाठी पक्षाकडून पुन्हा एकदा मला संधी देण्यात आली आहे. तसेच आमच्यातली बंडखोरी रोखण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करणार आहे. माझ्या पक्षातील वरिष्ठ नेते याबाबत बैठक घेऊन इच्छुक उमेदवारांची समजूत घालण्याचा प्रयत्न करणार आहेत.
Maharashtra Election 2024: शरद पवारांचा पक्ष फुटला आणि प्रवीण मानेंनी उमेदवारी अर्ज भरला; अखेर इंदापूरला बंडाळीची धग!
महाविकास आघाडीकडे अद्यापही मावळ तालुक्यात उमेदवार नाही. त्यामुळे आमच्या पक्षातीलच उमेदवार फोडायचा व त्याला उमेदवारी द्यायची असा प्रयत्न महाविकास आघाडी कडून केला जात आहे. मात्र जे इच्छुक आहेत त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न मी आणि माझ्या पक्षातील वरिष्ठ नेते करणार आहे. महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणूनच माझी निवड करण्यात आली. त्याबद्दल मी माझ्या वरिष्ठ नेत्यांचे जाहीर आभार मानतो.

जयकृष्ण नायर

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.