Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आधी यादी जाहीर, अर्ज भरण्यापूर्वी जरांगेंची भेट, कैलास पाटलांचं नियोजन काय?

3

Kailas Patil Meets Manoj Jarange Patil: पहिल्या अडीच वर्षामध्ये कैलास पाटील हे सत्तेतले आमदार होते, मात्र उर्वरित अडीच वर्षात ते विरोधी पक्षात बसले. पहिल्यांदाच आमदार झालेल्या कैलास पाटलांवर विविध विकासकामे होत नसल्यावरुन विरोधक टीक करतात.

हायलाइट्स:

  • यादीत दुसऱ्या क्रमांकावर नाव
  • अर्ज भरण्यापूर्वी जरांगेंची भेट
  • कैलास पाटलांचं नियोजन काय?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
कैलास पाटील मनोज जरांगे पाटील भेट

धाराशिव : शिवसेना उद्धव बाळासाहेब टाकरे यांच्या पक्षाने मराठवाड्यातून जे काही मोजके उमेदवार जाहीर केले त्यात धाराशीवमधील कळंबचे आमदार कैलास पाटील यांचाही समावेश आहे. मात्र उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी कैलास पाटलांनी थेट अंतरवाली सराटी गाठलं आणि मनोज जरांगे यांची भेट घेतली. कैलास पाटील यांनी शिवसेनेचे दोन गट झाल्यानंतर ठाकरेंसोबतच एकनिष्ठ राहण्याची भूमिका घेतली, याशिवाय लोकसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण जिल्हा पिंजून काढला आणि ओमराजे निंबाळकर यांच्या विजयातही मोलाची भूमिका निभावली. मात्र विधानसभा निवडणुकीत समीकरणे बदलली आहेत आणि विजयासाठी आता जातीय गणितेही तेवढीच महत्त्वाची आहेत. त्यामुळेच मनोज जरांगे आणि कैलास पाटील भेटीची चर्चा होत आहे.मनोज जरांगे यांनी राज्यभरात उमेदवार देण्याचा निर्णय घेतलाय, त्यांनी जर कळंब मतदारसंघातही उमेदवार दिला तर कैलास पाटील यांना त्याचा फटका बसू शकतो. राज्यभरात जसा जरांगेंच्या निर्णयाचा फटका महाविकास आघाडीला बसेल असा अंदाज लावला जातोय तसंच चित्र धाराशीवमध्येही आहे. त्यामुळे कैलास पाटलांची ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते. लोकसभा निवडणुकीच्या काळात मनोज जरांगे यांनी धाराशिव जिल्ह्याकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं आणि ओमराजे यांना लाखांच्या फरकाने ही निवडणूक जिंकता आली होती. बाजूच्या जालना, बीड जिल्ह्यामध्ये जरांगेंनी लक्ष घातल्याने प्रस्थापितांचा पराभव झाला होता. तसंच आता या निवडणुकीतही जरांगे धाराशीवमध्ये लक्ष घालतात का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
घड्याळ चिन्ह वापरताना ‘न्यायप्रविष्ठ’ उल्लेख नाही; सूचनांचे पालन करा अन्यथा… सुप्रीम कोर्टाची अजित पवार गटाला तंबी

पहिल्या अडीच वर्षामध्ये कैलास पाटील हे सत्तेतले आमदार होते, मात्र उर्वरित अडीच वर्षात ते विरोधी पक्षात बसले. पहिल्यांदाच आमदार झालेल्या कैलास पाटलांवर विविध विकासकामे होत नसल्यावरुन विरोधक टीक करतात, मात्र जिल्ह्यातले सत्ताधारी जाणिवपूर्वक काम होऊ देत नाहीत, निधी अडवतात असं कैलास पाटलांचं म्हणणं आहे. ठाकरे गटाने ६५ उमेदवारांची यादी जाहिर केलीय त्यात कैलास पाटील यांचंही नाव आहे. लोकसभेत ठाकरेंच्या सभांना लाखोंची गर्दी जमवण्याचं नियोजन करणाऱ्या कैलास पाटलांसाठी ही आता प्रतिष्ठेची लढाई आहे. ठाकरेंचे विश्वासू शिलेदार म्हणून गेल्या अडीच वर्षात ओळख मिळवल्यानंतर आता जनतेच्या कोर्टातही कैलास पाटलांना स्वतःला सिद्ध करायचंय.

विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होतंय, तर २३ नोव्हेंबरला निकाल जाहिर केला जाईल. राज्यभरातील दिग्गज उमेदवार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.