Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Raigad Accident: भरधाव कारची बाईकला जोरदार धडक, दुचाकीस्वाराला फरफटत नेल्याने जागीत अंत

15

Raigad Accident: अपघाताची माहिती घेतली असता अपघातातील दोनही वाहन म्हसळा मार्गे बोली दिघी बाजूकडे जात होती. कार चालकाने त्याच्या ताब्यातील गाडी सुसाट वेगात दुचाकी स्वाराची साईड घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला.

हायलाइट्स:

  • भरधाव कारची दुचाकीला धडक
  • फरफटत नेल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
  • रायगड येथील धक्कादायक घटना
Lipi
अपघात बातम्या

अमुलकुमार जैन, रायगड : दिघी – पुणे नव्याने विकसीत झालेल्या राष्ट्रीय मार्गावर दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. असाच एक जिवघेणा अपघात म्हसळा वरवठणे आयटीआय जवळ घडला आहे. म्हसळा बाजूकडून दिवेआगरकडे मारुती सुझुकी स्विप्टकार क्रमांक एमएच ०३ एझेड ९८६६ भरधाव वेगाने जात असताना पुढे जाण्याच्या प्रयत्नात कार चालकाने दुचाकी क्रमांक एमएच ०६ सीई १७११ दुचाकी चालकाला मागून जोरदार धडक दिली. फरफटत नेल्याने दुचाकीवर प्रवास करणाऱ्या इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदरची घटना म्हसळा वरवठणे हद्दीतील आयटीआय इमारती शेजारील राष्ट्रीय मार्गावर घडली आहे. अपघातात दुचाकी चालक रमेश गोवर्धन कांबळे (वय, ४५ रा. गणेशनगर बनोटी) हा इसमाचा जागीच मृत्यू झाला आहे.अपघाताची माहिती घेतली असता अपघातातील दोनही वाहन म्हसळा मार्गे बोली दिघी बाजूकडे जात होती. कार चालकाने त्याच्या ताब्यातील गाडी सुसाट वेगात दुचाकी स्वाराची साईड घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्याचा अंदाज चुकल्याने दुचाकी स्वाराला जोरदार धडक देऊन विरुद्ध बाजूला फरफटत नेल्याने दुचाकीवर असलेल्या इसमाच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव होऊन जागीच गतप्राण झाला आहे. घटनेची फिर्याद नागेश माळी यांनी म्हसळा पोलिस ठाण्यात दिली असता स.पो.नि सचिन कहाळे, पो. उपनिरीक्षक रोहीनकर, पो. ह. संतोष चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी व पंचनामा केला.
MVA Seat Sharing : महाविकास आघाडी ‘समान सूत्र’ गुंडाळण्याचे संकेत, काँग्रेस मोठा भाऊ, शंभरहून अधिक जागा; ठाकरे-पवारांना किती?

म्हसळा पोलिस ठाण्यात आरोपी जमीर मुजीब पेशमाम (वय ३६ रा. दिवेआगर ता. श्रीवर्धन) याच्यावर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उप निरिक्षक रोहिनकर हे करत आहेत. दोन पदरी काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या या राष्ट्रीय मार्गावर वाहनांच्या गतीची क्षमता निश्चित करण्यात आली नसल्याचे रस्त्याच्यालगत असलेल्या लोकवस्तील नागरिकांच्या जीवाला धोका वाढला आहे. रस्ता ओलांडत असताना किंवा वाहनाने प्रवास करताना क्षणात काय होईल काही सांगता येत नसल्याने विकास जीवावर बेतला जात असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. दिघी पुणे राष्ट्रीय मार्गावर गावजोड असलेल्या रस्त्यांवर गतिरोधक बसवावेत, अशी मागणी कर्तव्यदक्ष नागरिक चंद्रकांत कांबळे यांनी आमदार अनिकेत तटकरे, खासदार सुनिल तटकरे यांच्याकडे केली आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.