Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Palghar Vidhan Sabha : धक्कादायक म्हणजे काल रात्रीपासून आमदार श्रीनिवास वनगा कोणाच्याही संपर्कात नसल्याचे बोलले जात आहे.
Shrinivas Vanga : कुटुंबाला घात होण्याची भीती, श्रीनिवास वनगा अचानक नॉट रिचेबल, फोन लागेनात, १२ तासांपासून बेपत्ता
पत्नीला मुख्यमंत्र्यांचा फोन
श्रीनिवास वनगा नॉट रिचेबल असल्याचे वृत्त ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीने दिले आहे. त्यांचे दोन्ही फोन बंद आहेत. काल रात्री साडेसात-आठ वाजताच्या सुमारास ते अचानक घरातून निघून गेले. पत्रकार परिषद घेऊन आपल्या मनातील आवेग व्यक्त केल्यानंतर ते घराबाहेर पडले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन श्रीनिवास यांच्या पत्नी सुमन वनगा यांना आला होता. ते माझंही ऐकत नाहीत, निघून गेले आहेत, असं सुमन यांनी शिंदेंना सांगितलं. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी वनगांना विधान परिषदेवर संधी देणार असल्याचा शब्द दिल्याचं सुमन यांनी सांगितलं.
Amit Thackeray Net worth : वडील राज ठाकरेंनाच ८४ लाखांचं कर्ज, दादरच्या स्टेट बँकेत १०७ खाती, अमित ठाकरेंची संपत्ती किती?
आईचा मुख्यमंत्र्यांना सवाल
दरम्यान, माझा मुलगा, त्यांच्या वडिलांचे कार्य चांगल्या पद्धतीने करीत असताना त्याला विधानसभेची उमेदवारी का नाकारण्यात आली असा प्रश्न वनगा यांच्या आईने थेट मुख्यमंत्र्यांना केला आहे. त्यांनी जुन्या दिवसाची आठवण काढत, उद्धव ठाकरे साहेब आमच्यासाठी देव होते, परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घात केल्याचे वनगा कुटुंबीयांनी माध्यमांसमोर सांगितले.
दोन दिवसापासून श्रीनिवासने अन्न पाणीघेणे सोडले आहे, या नैराश्यातून ती स्वतःच्या जीवाचे बरे वाईट करू शकतो, अशी भीती त्याच्या आईने बोलून दाखवली. तर शिवसेनेत बंड झाले, त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर ४० आमदार होते. त्यापैकी ३९ आमदारांना पक्षाने उमेदवारी दिली. पक्षाने उमेदवारी नाकारलेले ते एकमेव आमदार आहेत.
Jitesh Antapurkar : क्रॉस व्होटिंगचे आरोप, गॉडफादरने भाजपचं तिकीट मिळवून दिलं, मात्र मतदारसंघातच टांगती तलवार
ठाकरे देव होते
‘आपण नेहमीच पक्षनिष्ठा जपून प्रामाणिक राहिलो, मतदारसंघात भरीव काम केले. परंतु जेव्हा उमेदवारी देताना, आपल्याला का नाकारण्यात आले त्याचे कारण समजू शकले नाही’, हे सांगताना श्रीनिवास वनगा यांना अश्रू अनावर झाले होते. तर, ‘उद्धव ठाकरे देव होते, मात्र पुनर्वसनाचा शब्द एकनाथ शिंदे यांनी न पाळता घात केला. स्वतःला कोंडून घेत, अन्न पाणी त्यागले असून आपले पती वेड्यासारखे करीत आहेत’, असे श्रीनिवास यांच्या पत्नीने शिंदे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय चुकला, पश्चाताप होत असल्याचे जाहीररित्या बोलून दाखवले.