Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Nanded News: ऊसाचे गाळप १५ नोव्हेंबरपासून होण्याची शक्यता; २९ कारखान्यांनी मागितले परवाने

9

Nanded News: यंदा २९ कारखान्यांनी गळीप हंगामात गाळपाची परवानगी मागणारे प्रस्ताव दाखल केले असून १५ नाव्हेंबरपासून ऊस गाळप होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र टाइम्स
sugar factory AII

नांदेड : गतवर्षीच्या तुलनेत ऊसाची उपलब्धता कमी झाली असली, तरी यंदा २९ कारखान्यांनी गळीप हंगामात गाळपाची परवानगी मागणारे प्रस्ताव दाखल केले असून १५ नाव्हेंबरपासून ऊस गाळप होण्याची शक्यता आहे.

दरवर्षी साधारणतः दिवाळीनंतर ऊस गाळपाला प्रारंभ होतो. नांदेड सहसंचालक कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या नांदेडसह लातूर, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांत २९ साखर कारखाने आहेत. त्यापैकी काही खाजगी, तर काही सहकारी आहेत. परभणी जिल्ह्यातील सातही कारखाने खाजगी आहेत. हिंगोली जिल्ह्यातील पाच कारखान्यांपैकी तीन सहकारी तर नांदेड जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांपैकी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या अधिपत्याखाली भाऊराव चव्हाण हा एकमेव सहकारी साखर कारखाना आहे. लातूर जिल्ह्यातील अकरांपैकी सहा कारखाने सहकारी तत्वावरील आहेत. गतवर्षी या सर्व साखर कारखान्यांनी मिळून एक कोटी १७ लाख ६६ हजार ५४५ मेट्रीक टन ऊसाचे गाळप केले होते. या माध्यमातून एक कोटी २० लाख ६५ हजार ८७ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. त्याचा सरासरी उतारा १०.२५ टक्के आला.

यंदाच्या गाळपासाठी प्रस्ताव दाखल करण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत होती. त्यानुसार २९ साखर कारखान्यांनी गाळपाची तयारी दर्शवली आहे. एकेकाळी सहकारी तत्वावरील जोमात चालणारे कारखाने हळूहळू राजकारणामुळे कोमात गेली; पण काही कारखान्यांचे रूपांतर खाजगी कारखान्यात झाले. यंदाची ऊसाची उपलब्धता लक्षात घेता कारखान्यांचे गाळप लवकरच संपण्याची चिन्हे आहेत.
मुहूर्त ठरला! भारताची जनगणना पुढील वर्षी; अहवाल कधी मिळणार? जातनिहायबाबत काय निर्णय? जाणून घ्या सर्वाकाही
गतवर्षीच्या तुलनेत या चार जिल्ह्यात मिळून साखर कारखान्यांकडे दोन लाख दहा हजार ९९९ हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड असल्याची नोंद आहे; पण कृषी विभागाच्या अंदाजानुसार एक लाख दहा हजार हेक्टरवर ऊस असण्याची शक्यता आहे. लातूर जिल्ह्यात ऊसाची लागवड कमालीची घटल्याचे सांगण्यात आले. मार्च अखेरपर्यंत ऊसाचे गाळप पूर्ण होणार आहे. या गळीप हंगामासाठी ऊसाची योग्य आणि किफायतशीर किंमत अर्थात एफआरपी ३४० रुपये प्रति क्विंटल असे सूत्र केंद्राने ठरवून दिले आहे. गतवर्षी मराठवाड्यात २५०० ते २८०० रुपये या प्रमाणे एफआरपी मिळाली होती.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.