Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अपेक्षांचा ‘दिवा’ विझला, उमेदवारी नाकारल्याने शिवसेना शहरप्रमुख नाराज; ‘कल्याण ग्रामीण’मध्ये नाराजीनाट्य
Kalyan Rural Assembly constituency : कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या रमाकांत मढवी यांना उमेदवारी नाकारण्यात आली आणि राज्यातील इतर मतदारसंघांप्रमाणे कल्याण ग्रामीणमधूनही नाराजीनाट्य पाहायला मिळालं.
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सुभाष भोईर आणि मनसेचे राजू पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत प्रचाराला धुरळा उडवला आहे. मात्र अर्ज दाखल करण्यासाठी २४ तास शिल्लक असताना या मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराबाबत चर्चेचे गुऱ्हाळ सुरु होते. शिवसेना दिवा शहरप्रमुख रमाकांत मढवी आणि डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांच्यात येथील उमेदवारीसाठी कांटे की टक्कर सुरु होती.
Nagpur News : महाविकास आघाडी फुटली! शिवसेनेच्या विरोधात काँग्रेस उमेदवाराचा अपक्ष अर्ज, जागावाटपानंतर मोठा राडा
तर लोकसभा निवडणुकीत मनसेने येथील कल्याण मतदारसंघात डॉ. श्रीकांत शिंदे यांना बिनशर्त पाठिंबा दिल्याने या बदल्यात शिवसेनेकडून ही जागा मनसेचे राजू पाटील यांच्यासाठी सोडण्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र या सर्व चर्चा फोल ठरवत येथून शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली. राजेश मोरे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडल्याने अपेक्षेप्रमाणे रमाकांत मढवी हे नाराज झाले. त्यामुळे ही नाराजी नेमके कोणाच्या पथ्यावर पडते हे आगामी निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होणार आहे.
Jitendra Awhad : गुरुप्रमाणे शिष्याचीही पावसात चिंब भिजत राजकीय फटकेबाजी, मुंब्र्यात भर पावसात आमदार जितेंद्र आव्हाड यांचे भाषण
लोकसभेतील मतांची गोळाबेरीज
सहा महिन्यांपूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे हे सलग तिसऱ्यांदा विजयी झाले होते. या विजयामध्ये कल्याण ग्रामीण मतदारसंघाने डॉ. शिंदे यांना साथ दिली होती. याठिकाणी त्यांना एक लाख ५१ हजार ७०२ मते मिळाली होती. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वैशाली दरेकर यांना येथून ६५ हजार ४०७ मते मिळाल्याने शिंदे यांना येथे ८६ हजार २९५ मतांचे मताधिक्य मिळाले होते. या मतांचे दान यंदा कोणाला तारणार व कोणाला पाडणार, हा चर्चेचा विषय आहे.
Ajit Kakade : ऑफिसर पदाचा राजीनामा, जरांगे पाटलांचा आवाज बुलंद करण्यासाठी उच्चशिक्षित तरुण निवडणुकीच्या रिंगणात
चर्चा, बैठका निष्फळ
शिवसेनेतील बंडानंतर ठाणे महापालिकेचे दिव्यातील तब्बल आठपैकी सात नगरसेवकांनी मुख्यमंत्री शिंदे यांची साथ दिली. त्यामुळे मढवी यांना दिवा शहरप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली. तसेच बंडानंतर माजी आमदार सुभाष भोईर यांनी शिवसेनेमध्ये (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मढवी यांनी मतदारसंघासाठी लॉबिंग करत दिवा महोत्सव, दिवा मॅरेथॉन असे सांस्कृतिक कार्यक्रम असो अथवा मुख्यमंत्री शिंदे व खासदार डॉ. शिंदे यांच्या निधीच्या माध्यमातून शहरात कामाचा सपाटा लावला होता.
Thane News : अपेक्षांचा ‘दिवा’ विझला, उमेदवारी नाकारल्याने शिवसेना शहरप्रमुख नाराज; ‘कल्याण ग्रामीण’मध्ये नाराजीनाट्य
गेल्या काही महिन्यात या भागातील शिवसेनेचे माजी नगरसेवक, पदाधिकारी यांच्या चर्चा, बैठका सुरु असताना उमेदवारीने हुलकावणी दिल्यानंतर मढवी व दिव्याच्या माजी लोकप्रतिनिधींनी राजेश मोरे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या रॅलीकडे पाठ फिरवली. आम्ही उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते, मात्र या प्रयत्नांना अपयश आले. येत्या काळात कार्यकर्त्यांशी बोलून भविष्यातील रणनीतीबाबत निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया मढवी यांनी दिली.