Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

दोन मिनिटांचा उशीर, काँग्रेसच्या माजी मंत्र्याची संधी हुकली, उमेदवारीपासून ‘वंचित’

10

Nagpur Central Vidhan Sabha : मध्य नागपुरातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर पाच तास हा प्रकार सुरू होता, त्यानंतर रात्री आठ वाजल्यानंतर अनीस अहमद बाहेर आले आणि त्यांनी आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत सांगितले.

Lipi
अनीस अहमद

नागपूर : नागपूर शहरातील मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातील लढत अतिशय रंजक झाली होती. काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले माजी मंत्री अनीस अहमद या जागेवर वंचित बहुजन आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे तिरंगी लढत अपेक्षित होती. मात्र याला योगायोग म्हणायचं की आणखी काही? कारण दोन मिनिटं उशीर झाल्याने अनीस अहमद यांना आपला उमेदवारी दाखल करता आलेला नाही.

आपल्या विरोधात मोठा कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप अनीस अहमद त्यांनी केला. मध्य नागपुरातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर पाच तास हा प्रकार सुरू होता, त्यानंतर रात्री आठ वाजल्यानंतर अनीस अहमद बाहेर आले आणि त्यांनी आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत सांगितले.

काँग्रेस सोडून वंचित प्रवेश

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनीस अहमद यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसची साथ सोडून मुंबईत वंचित बहुजन आघाडी पक्षात प्रवेश घेतला. वंचितकडून मध्य नागपूर मतदारसंघातून त्यांना उमेदवारी जाहीर झाली. मात्र अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या.

मंगळवारी दुपारी तीन वाजून दोन मिनिटांनी ते उमेदवारी अर्ज भरायला आरओ कार्यालयात पोहोचले. त्यांना दोन मिनिटे उशीर झाला. त्यानंतर दुपारपासून रात्री जवळपास आठ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अर्जाबाबत निवडणूक अधिकाऱ्यांसमोर सुनावणी झाली. अखेर त्यांचा अर्ज स्वीकार करण्यात आलेला नाही.
Trupti Sawant : मातोश्रीच्या अंगणात मनसेचा ट्विस्ट, नारायण राणेंना पाडणाऱ्या माजी आमदाराला तिकीट जाहीर
तब्बल पाच तासांनंतर ते तेथून बाहेर पडले. आता त्यांना वेळेचं भान राहिलं नाही, की त्यांना अर्ज भरायचाच नव्हता अर्शा चर्चा रंगल्या आहेत. मात्र अनीस अहमद अर्ज भरण्यापासून ‘वंचित’ राहिले हे खरं.

तिरंगी लढत नाहीच

मध्य नागपूरच्या जागेवर भाजपचे प्रवीण दटके आणि काँग्रेसचे बंटी शेळके यांच्यात थेट लढत होणार आहे. अनीस अहमद यांचा निवडणूक रिंगणात प्रवेश झाल्याने उत्सुकता वाढली होती, मात्र आता थेट दोन उमेदवारांमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. अनीस अहमद यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने अनेक चर्चा सुरू होत्या. आता ते उमेदवारी दाखल करू शकले नाहीत.
Amit Thackeray : माहीममध्ये अमित ठाकरेंचं वजन वाढलं? भाजप मनसेचा प्रचार करण्याचे संकेत, सरवणकरांची कोंडी
अहमद आता काँग्रेस पक्षातही नाही. मध्य नागपूरच्या जागेवर मुस्लिम उमेदवार न दिल्याबद्दलही अहमद यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यांच्या मते या जागेवर निर्णायक भूमिका बजावणाऱ्या मुस्लिम समाजाचा उमेदवार न दिल्याने त्यांच्या जुन्या पक्षाने समाजावर अन्याय केला आहे. मंगळवारी अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केले मात्र चर्चा बहुतांशी अनीस अहमद यांच्या उमेदवारीचीच होती.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.